Header

ST Workers Strike | एसटी संप चिघळण्याची शक्यता, पुणे, जळगावमध्ये घडला धक्कादायक प्रकार

ST Workers Strike | एसटी संप चिघळण्याची शक्यता, पुणे, जळगावमध्ये घडला धक्कादायक प्रकार

ST Workers Strike | an employee at the pune shivajinagar depot suffered a heart attack after receiving a termination letter incident happen in jalgaon also

पुणे :  बहुजननामा ऑनलाइन  – ST Workers Strike | मागील महिनाभरापासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Workers Strike) सुरु आहे. त्यावर राज्य सरकार (Maharashtra Government) तोडगा काढून कर्मचाऱ्यांचे पगार वाढ (Salary increase) करण्याचे जाहीर केले. परंतु विलिनीकरणाच्या (Merger) मागणीसाठी काही कर्मचारी अद्यापही संपावर (ST Workers Strike) ठाम असल्याने एसटी महामंडळाने त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अशातच पुण्यात (Pune) एक धक्कादायक घटना घडली आहे. शिवाजीनगर डेपोमध्ये (Shivajinagar Depot) काम करत असलेल्या एका कर्मचाऱ्याला सेवा समाप्तीचे पत्र (service termination Letter) आल्यानंतर हृदयविकाराचा झटका (Heart attack) आला आहे.

 

मारुती घडसिंग असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी कर्मचारी शिवाजीनगर डेपो येथे आंदोलनाला (Agitation) बसलेले असताना ते पत्र वाचून अचानक घडसिंग यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना घरी नेण्यात आले. परंतु दुखणे असह्य झाल्याने त्यांना तातडीने धानोरी (Dhanori) परिसरातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. (ST Workers Strike)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

जळगावातही घडली घटना

निलंबनाची नोटीस मिळाल्याच्या धक्क्याने चोपडा आगारातील (Chopda depot) संपात सहभागी बस कर्मचारी चक्कर येऊन पडल्याची घटना घडली. चोपडा आगारातील चालक बी.एम. कोळी यांना भोवळ येऊन त्यांची तब्येत अचानक खालावली. बी.एम. कोळी यांना सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास आगार प्रमुख यांनी कार्यालयात बोलावले होते. त्या ठिकाणी त्यांना निलंबनाची नोटीस (suspension Notice) देण्यात आली.

 

निलंबनाच्या नोटीशीने कोळी यांना भोवळ आली आणि ते जमिनीवर कोसळले.
हे पाहून उपस्थितांनी त्यांना ताताडीने चोपडा उपजिल्हा रुग्णालयात (Chopda Sub-District Hospital) दाखल केले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. सागर पाटील यांनी सांगितले.
यावेळी कर्मचारी व नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.
कोळी यांच्यासह 5 जण कामावर हजर न झाल्याने त्यांना निलंबनाची नोटीस देण्यात आली, असे आगार प्रमुखांनी सांगितले.

 

Web Title :- ST Workers Strike | an employee at the pune shivajinagar depot suffered a heart attack after receiving a termination letter incident happen in jalgaon also.

 

Supreme Court | ‘कोणतेही डॉक्टर आपल्या रूग्णाला जीवनाची खात्री देऊ शकत नाहीत’ – सर्वोच्च न्यायालय

Maharashtra Rains | राज्यात पुढील 3 दिवसांत ‘या’ 8 जिल्ह्यांत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस, IDM चा अंदाज

Bombay High Court | ‘जोपर्यंत वडील जिवंत आहेत, तोपर्यंत मुलीला मालमत्तेत हिस्सा मिळणार नाही’ – मुंबई उच्च न्यायालय

Petrol Price | केजरीवाल सरकारकडून दिल्लीकरांना मोठा दिलासा ! पेट्रोल 8 रूपयांनी स्वस्त, महाराष्ट्रात ठाकरे सरकारकडून अद्याप निर्णय नाही

The post ST Workers Strike | एसटी संप चिघळण्याची शक्यता, पुणे, जळगावमध्ये घडला धक्कादायक प्रकार appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article