Header

Horoscope 2022 | 2022 नववर्ष ‘या’ 6 राशींच्या लोकांसाठी लाभदायक; भरगच्च पैसा मिळण्याची शक्यता

Horoscope 2022 | 2022 नववर्ष ‘या’ 6 राशींच्या लोकांसाठी लाभदायक; भरगच्च पैसा मिळण्याची शक्यता

Horoscope 2022 | people of 6 zodiac signs are likely to get thunderous money

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Horoscope 2022 | नव वर्षाची सुरूवात झाली आहे. 2021 वर्षामधून वर्ष-2022 मध्ये पदार्पन केलं आहे. 2022 हे वर्ष कोणत्या राशीच्या (Horoscope 2022) लोकांसाठी लाभदायक असणार आहे. त्याचबरोबर कोणत्या लोकांसाठी हे वर्ष आर्थिक बाबतीत अडचणीचे जाणार आहे. हे राशींमधून समजणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गुरु आणि चंद्र हे ग्रह संपत्तीचे कारक मानले जातात. अशा परिस्थितीत या सर्व ग्रहांच्या स्थितीच्या आधारे आर्थिक कुंडली (Economic Horoscope) काढली जातेय. या राशीबाबत जाणून घ्या.

मेष (Aries) –
या राशीच्या लोकांची अनेक वर्ष चालत आलेल्या आर्थिक संकटातून सुटका होईल. वर्षभर (2022) भरपूर उत्पन्न मिळेल, काही प्रमाणात खर्च देखील होईल. जर तुम्ही नवीन घर-कार, मौल्यवान दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ती गोष्ट साध्य होईल.

वृषभ (Taurus) –
या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात 2022 या वर्षी लक्षणीय वाढ होईल. हे लोक सुविधांवर खर्च करतील आणि बचत देखील करतील. वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत गुंतवणूक करताना काळजी घ्या. जे कर्ज बरेच दिवस चालले होते, ते या 2022 वर्षी सुटण्याची शक्यता.

मिथुन (Gemini) –
या राशीच्या लोकांसाठी 2022 वर्ष उत्पन्नाच्या बाबतीत सरासरीचे राहील. अनपेक्षित मार्गाने तुम्हाला पैसे मिळतील. जमीन, इमारत, कार खरेदी करण्याची योजना असेल, तर ती गोष्ट यावर्षी पूर्ण होऊ शकतात. (Horoscope 2022)

कर्क (Cancer) –
या राशीच्या लोकांचे 2022 वर्षात पैशामुळे कोणतेही काम थांबणार नाही. मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. उत्पन्नात वाढ होऊ शकते. उत्पन्न वाढू शकते. एकंदरीत पैशाच्या दृष्टीने हे वर्ष सुंदर जाईल.

सिंह (Leo) –
या राशीच्या लोकांना 2022 वर्षात भरपूर धनलाभ होईल. उत्पन्नाचे अनेक मार्ग मिळतील. तुम्हाला इतके पैसे मिळतील की त्या माध्यमातून तुम्ही नवीन काम सुरू करू शकता.

कन्या (Virgo) –
या राशीच्या लोकांना 2022 वर्षी नवीन मार्गाने उत्पन्न मिळेल. मालमत्ता खरेदी करता येईल. काही अनपेक्षित खर्चही होऊ शकतात.

तूळ (Libra) –
या राशीच्या लोकांचे 2022 वर्षात उत्पन्न सामान्य असेल आणि खर्च देखील जास्त होतील. अशा स्थितीत अर्थसंकल्पावर लक्ष केंद्रीत करताना खर्च करणे अधिक योग्य ठरेल.

वृश्चिक (Scorpio) –
या राशीच्या लोकांवर 2022 वर्षात पैशांचा पाऊस पडेल, तरीही बचत करणे कठीण जाईल. त्यामुळे आरामात खर्च करा आणि हुशारीने गुंतवणूक करा.

धनु (Sagittarius) –
या राशीच्या व्यक्तीचे उत्पन्न वाढेल, यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. परदेशातून लाभ होऊ शकतो. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होऊ शकतो. गुंतवणुकीसाठी हे वर्ष चांगले आहे.

मकर (Capricorn) –
मकर राशीच्या लोकांच्या उत्पन्नात या वर्षी वाढ होईल आणि आर्थिक नियोजन उत्तम असल्यामुळे ते वर्षभर आरामात घालवतील. अचानक होणारा खर्च तुम्हाला थोडा त्रास देऊ शकतो.

कुंभ (Aquarius) –
या राशीच्या लोकांसाठी 2022 वर्ष आर्थिक बाबतीत खूप चांगले राहील.
उत्पन्न सामान्य असेल आणि तुम्ही तुमचे खर्च आरामात भागवू शकाल. जोखमीची गुंतवणूक करू नका.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

मीन (Pisces) –
या राशीच्या लोकांनी उत्पन्न आणि खर्च यात समतोल साधावा. बचत करून गुंतवणूक करणे चांगले. पैसे वाचवण्यासाठी चुकीच्या गोष्टी करू नका.

टीप – वरील माहिती धार्मिक श्रध्दा आणि जनमानसांच्या श्रध्देवर आधारित आहे.
www.policenama.com यावरून कुठलाही दावा करत नाही.

Web Title :- Horoscope 2022 | people of 6 zodiac signs are likely to get thunderous money

KVP | ‘या’ सरकारी योजनेत इतक्या महिन्यात दुप्पट होतील तुमचे पैसे, जाणून घ्या डिटेल

ST Workers Strike | आतापर्यंत 11008 संपकरी एसटी कर्मचार्‍यांचे निलंबन ! 783 जण बडतर्फ तर 2047 जणांना कारणे दाखवा नोटीस

Cyber Crime | सावधान ! ओमिक्रॉनच्या नावाखाली होतेय फसवणूक, गृह मंत्रालयाकडून गाईडलाईन जारी

The post Horoscope 2022 | 2022 नववर्ष ‘या’ 6 राशींच्या लोकांसाठी लाभदायक; भरगच्च पैसा मिळण्याची शक्यता appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article