Header

Samantha Akkineni | राम चरणसोबतच्या Kissing सीनवर अभिनेत्री समांथाचे मोठं विधान; ‘लिपलॉक’चं सांगितलं सत्य

Samantha Akkineni | राम चरणसोबतच्या Kissing सीनवर अभिनेत्री समांथाचे मोठं विधान; ‘लिपलॉक’चं सांगितलं सत्य

Samantha Akkineni | samantha tells an interesting story on the kissing scene with rrr star ram charan in rangasthalam
बहुजननामा ऑनलाइन टीम – Samantha Akkineni | दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री समांथा अक्किनेनी (Samantha Akkineni) ही मागील काही दिवसांपासून तिच्या आणि अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) याच्या घटस्फोटामुळे चांगलीच चर्चेत आहे. त्याचबरोबर सध्या पुष्पा चित्रपटातील आयटम सॉंगमुळे देखील चर्चेत आलीय. मात्र आता तर वेगळ्याच किस्यामुळे चर्चेत आलीय. समांथा सहकलाकार राम चरणसोबत (Ram Charan) दिलेल्या तिच्या किसिंग सीन (Kissing Scene) किस्सा समोर आला आहे. 2018 साली प्रदर्शित झालेल्या ‘रंगस्थलम’ (Rangasthalam) या फिल्ममध्ये राम चरण आणि समांथामध्ये एक किसिंग सीन दाखवला गेला होता. यात आता किस मागचं सत्य थेट समांथानेच सांगितलं आहे.

समांथा म्हणते की, ‘खरं तर हा किसिंग सीन नसून व्हीएफएक्स (VFX) पराक्रम होता. खरंतर, प्रारभी जेव्हा रंगस्थलच्या दिग्दर्शकाने समांथा आणि रामला किसिंग सीनची कल्पना दिली तेव्हा दोघांनीही ते करण्यास नकार दिला होता. त्यादरम्यान राम चरण देखील टेन्शनमध्ये होता की, त्यांची पत्नी उपासना कामिनेनी असे सीन बघेल तर तिची यावर काय प्रतिक्रिया असणार. परंतु दिग्दर्शित सुकुमारने (Director Sukumar) हा सीन शूट करण्यासाठी कलाकारांवर सतत आग्रह केला परंतु दोघांनीही साफ नकार दिला.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

दरम्यान, समांथा आणि राम चरणच्या लिप लॉक सीनला (Lip Lock Scene) नकार दिल्यानंतर निर्मात्यांनी व्हीएफएक्सच्या सहाय्याने हा सीन शूट केला. यात राम चरण आणि समांथा एकमेकांच्या जवळ येऊन किस करतात. परंतु ते किस करत नाहीत. हे काम व्हीएफएक्सच्या सहाय्याने केले गेले. या सीनमध्ये केवळ गालाला स्पर्श होता, लिप लॉक नव्हता, असं समांथा म्हणाली. पण, प्रेक्षकांच्या मनात वेगळंच राहिलं. त्यावर समांथाने (Samantha Akkineni) स्पष्ट केलं.

‘मला माहित आहे की लोक शिवीगाळ करत होते की मी माझ्या लग्नानंतर असे सीन कसे करू शकते. जर विवाहित सुपरस्टार्सने असे केले तर तुम्ही त्यांना हाच प्रश्न विचाराल का? कारण मी मुलगी आहे? माझे कुटुंब मला खूप सपोर्ट करते. खरंतर माझे सासरे, ज्यांनी द्वेष करणाऱ्यांची चेष्टा केली आणि त्यामुळे मी सेटवर आरामात काम करू शकले. तर, ‘फॅमिली मॅन 2’ (Family Man 2) या वेब सीरिजमध्ये समांथाने खूप बोल्ड सीन्स दिले आहेत जे अक्किनेनी कुटुंबाला आवडले नाहीत आणि त्यामुळे नागा आणि समांथा वेगळे झालेत. असं समांथाने सांगितलं.

 

 

Web Title :- Samantha Akkineni | samantha tells an interesting story on the kissing scene with rrr star ram charan in rangasthalam

 

 

Horoscope 2022 | 2022 नववर्ष ‘या’ 6 राशींच्या लोकांसाठी लाभदायक; भरगच्च पैसा मिळण्याची शक्यता

 

KVP | ‘या’ सरकारी योजनेत इतक्या महिन्यात दुप्पट होतील तुमचे पैसे, जाणून घ्या डिटेल

 

ST Workers Strike | आतापर्यंत 11008 संपकरी एसटी कर्मचार्‍यांचे निलंबन ! 783 जण बडतर्फ तर 2047 जणांना कारणे दाखवा नोटीस

The post Samantha Akkineni | राम चरणसोबतच्या Kissing सीनवर अभिनेत्री समांथाचे मोठं विधान; ‘लिपलॉक’चं सांगितलं सत्य appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article