Header

Pune Crime | 76 वर्षाच्या आईला औषधांचा ओव्हर डोस देऊन प्लॅस्टिक पिशवीत चेहरा घालून खून, नातेवाईकांना मेसेज पाठवून आरोपी इंजिनिअर मुलाची आत्महत्या; पुणे शहरात खळबळ

Pune Crime | 76 वर्षाच्या आईला औषधांचा ओव्हर डोस देऊन प्लॅस्टिक पिशवीत चेहरा घालून खून, नातेवाईकांना मेसेज पाठवून आरोपी इंजिनिअर मुलाची आत्महत्या; पुणे शहरात खळबळ

Pune Crime | 76-year-old mother murdered by giving an overdose of drugs, putting her face in a plastic bag, sending messages to relatives, accused engineer's suicide; Excitement in Pune city
पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | आपल्या 76 वर्षाच्या आईला औषधांचा ओव्हर डोस (Medicine Overdose) देऊन त्यांचा चेहरा प्लॅस्टिक पिशवीत घालून त्यांचा खून (Murder in Pune) केला व त्यानंतर इंजिनिअर तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide in Pune) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने नातेवाईकांना मेसेज पाठवला होता. यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ (Pune Crime) उडाली आहे.

गणेश मनोहर फरताडे Ganesh Manohar Fartade (वय 42) आणि त्याची आई निर्मला मनोहर फरताडे Nirmala Manohar Fartade (वय 76, रा. अक्षय गार्डन सोसायटी, धनकवडी) असे या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी गणेश याच्या मावस बहिणीने सहकारनगर पोलीस ठाण्यात ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) फिर्याद दिली आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश फरताडे व आई निर्मला फरताडे हे दोघे धनकवडीमध्ये (Dhankawadi News) राहत होते. गणेश हा इंजिनिअर (Engineer) होता. त्याची नोकरी गेली होती. 5 वर्षापूर्वी त्याच्या वडिलांचे आजारपणामुळे निधन झाले होते. त्यांच्या आजारपणात खूप पैसे खर्च झाले होते. तसेच त्याच्या आईला देखील अनेक व्याधी होत्या. त्यावर पैसे खर्च होत होते. आईचा औषधाचा खर्च आणि कामधंदा नसल्याने तो कर्जबाजारी झाला होता. याच नैराश्येत गणेश होता यातूनच त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

आपल्या मागे आईचे कोण पाहणार असा प्रश्न त्याला पडला होता. या कारणावरुन त्याने आईला औषधाचा ओव्हर डोस दिला. ती निपचित पडल्यावर तिच्या चेहर्‍यावर प्लॅस्टिकची पिशवी घालून गळ्यास पांढर्‍या रंगाच्या दोरीने घट्ट बांधून तिचा खून (Pune Crime) केला. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने 2 वाजून 10 मिनिटांनी मेसेज केला. आपण बेरोजगार आणि कर्ज बाजारी झाल्याने आत्महत्या करीत आहोत, असा मेसेज त्याने नातेवाईकांना पाठविला. त्यानंतर तो घराच्या छतावर गेला. तेथील लोखंडी हुकाला नायलॉनची दोरी बांधून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

गणेशने पाठवलेला मेसेज त्याच्या नातेवाईकांनी सकाळी पाहिला. त्यानंतर त्यांनी याची माहिती सहकारनगर पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहकारनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मावस बहिणीच्या फिर्यादीवरुन खुनाच्या गुन्ह्याची नोंद केली असून पोलीस निरीक्षक मुलाणी (Police Inspector Mulani) अधिक तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | 76-year-old mother murdered by giving an overdose of drugs, putting her face in a plastic bag, sending messages to relatives, accused engineer’s suicide; Excitement in Pune city

 

 

Nawab Malik-NCB | ‘एनसीबीचा फर्जीवाडा सुरुच, भाजपचे मोठे नेते गृहमंत्रालयात करताहेत लॉबिंग’, कथित ऑडिओ क्लिप ऐकवली; नवाब मलिकांचा गंभीर आरोप (व्हिडिओ)

 

Aadhaar Card Franchise | ‘आधार कार्ड’ची मोफत घेऊ शकता फ्रेंचायजी आणि करू शकता मोठी कमाई, जाणून घ्या कसे

 

KVP | ‘या’ सरकारी योजनेत इतक्या महिन्यात दुप्पट होतील तुमचे पैसे, जाणून घ्या डिटेल

The post Pune Crime | 76 वर्षाच्या आईला औषधांचा ओव्हर डोस देऊन प्लॅस्टिक पिशवीत चेहरा घालून खून, नातेवाईकांना मेसेज पाठवून आरोपी इंजिनिअर मुलाची आत्महत्या; पुणे शहरात खळबळ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article