Header

Pune Crime | कलयुग ! पोटच्या मुलानं केला आई-बापावर खुनी हल्ला, आई जागीच ठार; इंदापूर तालुक्यातील घटना

Pune Crime | कलयुग ! पोटच्या मुलानं केला आई-बापावर खुनी हल्ला, आई जागीच ठार; इंदापूर तालुक्यातील घटना

Pune Crime | Son attempt to murder of mother and father, mother died on spot, incident happens in indapur taluka of pune district.

इंदापूर : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | मागेल तेवढे पैसे देत नाही आणि जमिनीचे वाटप करत नसल्याच्या कारणावरून मुलाने आपल्या आई वडिलांवर सशस्त्र हल्ला (Attempt To Murder) केल्याची घटना घडली. ही घटना इंदापूर तालुक्यातील (Indapur News) काझड येथे रविवारी दुपारी घडली असून या हल्ल्यात आईचा जागीच मृत्यू (Murder in Pune) झाला तर वडील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटमुळे परिसरात खळबळ (Pune Crime) उडाली आहे.

अलका पांडुरंग नरुटे (वय ५५) असे मृत्यू झालेल्या आईचे नाव आहे तर वडिल पांडुरंग बाबुराव नरुटे (वय ६०) हे जखमी झाले असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुलगा अमित पांडुरंग नरुटे (वय ३१) याच्यावर वालचंदनगर पोलीस ठाण्यात (Walchand Nagar Police Station) गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, काझड येथे रविवारी दुपारी पांडुरंग नरुटे आणि मुलगा अमित यांच्यामध्ये मागेल तेवढे पैसे देत नाही, जमीन वाटू देत नाही या कारणावरून वादावादी झाली. हा वाद इतका टोकाला गेला की, अमितने आपल्या वडिलांना लथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याचबरोबर कोयत्याने ही वार केले. यामध्ये पांडुरंग नरुटे यांच्या डाव्या हाताचा अंगठा तुटून पडला. ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर अमितने आई अलका यांच्यावरही कोयत्याने हल्ला केला. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. भर दिवसा घडलेल्या या घटमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
अमित विरोधात पोलिसांत गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बी एन लातूरे (API B.N. Lature) करत आहेत.

Web Title :Pune Crime | Son attempt to murder of mother and father,
mother died on spot, incident happens in indapur taluka of pune district.

 

Pune Corona | चिंताजनक ! शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या अडीच हजारांच्यावर, गेल्या 24 तासात 524 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

World Health Organization | जागतीक आरोग्य संघटनेने आत्मविश्वास वाढवला ! ‘2022 मध्ये कोरोना महामारीचा अंत होईल, पण…’

Whatsapp Account Ban | खबरदार ! ‘ही’ चूक केल्यास व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट होईल बॅन, नोव्हेंबरमध्ये 17.5 लाख अकाउंट झालेत BAN, जाणून घ्या सविस्तर

OBC Reservation | केंद्रातील भाजप सरकारने ओबीसी आरक्षणाचा बळी घेतला, विजय वडेट्टीवारांचा घणाखाती आरोप; म्हणाले – ‘…तर मंत्रिपदाचा त्याग करणार’

The post Pune Crime | कलयुग ! पोटच्या मुलानं केला आई-बापावर खुनी हल्ला, आई जागीच ठार; इंदापूर तालुक्यातील घटना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article