Header

Gulabrao Patil | … तर मी बांगड्या घालून बसलेलो नाही, गुलाबराव पाटलांचा भाजपला इशारा

Gulabrao Patil | … तर मी बांगड्या घालून बसलेलो नाही, गुलाबराव पाटलांचा भाजपला इशारा

Gulabrao Patil | shiv sena minister gulabrao patil criticises bjp in nevasa of ahmednagar

अहमदनगर : बहुजननामा ऑनलाइन – शिवसेनेचे (Shivsena) आक्रमक नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी भाजपवर (BJP) जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांच्या नेवासा मतदारसंघात (Nevasa Constituency) विविध विकास कामांचे लोकार्पण गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्याहस्ते झाले. त्यावेळी त्यांनी शनिशिंगणापूर (Shanishinganapur) येथे शनि देवाचे दर्शन घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपवर निशाणा साधला.

भाजपचा समाचार घेताना गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) म्हणाले, भाजपचे किरीट सोमय्या (Kirit Somaiya) दररोज भ्रष्टाचाराचे (Corruption) नवनवीन आरोप करत शिवसेनेसह महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) लक्ष्य करत आहेत. भ्रष्टाचार काढण्यासाठी कोणाला प्रमाणपत्र (Certificate) दिलेलं नाही. शिवसेना, काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी (NCP) यांचे भ्रष्टाचार काढण्यासाठी ईडीचा (ED) वापर केला जात आहे. त्यामुळे राजकारणाची दिशाच बदलत चालली असून भाजपचे सगळे मंडलेश्वर आहेत का ? असा सवाल उपस्थित करत पाटील यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांचा समाचार घेतला.

मी बांगड्या घालून बसलो नाही
काँग्रेसमुळे देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केले होते. त्यानंतर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत राज्यभरात भाजप विरोधात आंदोलन (Agitation) सुरु केले. काही ठिकाणी भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काँग्रेसने राज्यभरात केलेल्या आंदोलनाचे समर्थन करताना गुलाबराव पाटील म्हणाले, जर कोणी शिवसेना म्हणून माझ्या पक्षावर टीका करत असेल तर मी बांगडी घालून बसलेलो नाही, असा इशारा त्यांनी भाजपला दिला. तसेच भाजप काँग्रेसबद्दल बोलली आहे तर त्यांच्या अस्मितेसाठी ते आंदोलन करणारच असेही पाटील यांनी सांगितले.

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

विषाणू कोणी खिशात आणला नाही
पंतप्रधानांनी संसदेत केलंल वक्तव्य हे चुकीचे आहे. विषाणू कोणी खिशात आणला नाही, त्यामुळे अशा प्रकारचे वक्तव्य करणे योग्य नाही. सर्व्हेमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी (Maharashtra CM) केलेल्या कामाचे कौतुक होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) देखील धारावी पॅटर्नचे (Dharavi Pattern) कौतुक केले. कोणत्याही राज्याच्या बाबतीत असं बोलणं योग्य नाही, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.

 

 

Web Title :- Gulabrao Patil | shiv sena minister gulabrao patil criticises bjp in nevasa of ahmednagar

 

 

RBI Recruitment 2022 | बँकिंग क्षेत्रात करिअर करणार्‍यांसाठी सुवर्णसंधी ! RBI मध्ये लवकरच तब्बल 950 जागांसाठी मेगा भरती; जाणून घ्या

 

Pune Corona Update | पुणेकरांना मोठा दिलासा ! गेल्या 24 तासात नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत कमालीची घट, जाणून घ्या आकडेवारी

 

Amruta Fadnavis | व्हॅलेंटाईन दिनी अमृता फडणवीसांचं स्पेशल ट्विट; म्हणाल्या – ‘तूच ह्रदयात, तूच माझ्या श्वासात”

The post Gulabrao Patil | … तर मी बांगड्या घालून बसलेलो नाही, गुलाबराव पाटलांचा भाजपला इशारा appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article