Header

IRCTC Credit Card | रेल्वेने लाँच केले क्रेडिट कार्ड ! तिकिट बुकिंगमध्ये डिस्काऊंटसह मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या

IRCTC Credit Card | रेल्वेने लाँच केले क्रेडिट कार्ड ! तिकिट बुकिंगमध्ये डिस्काऊंटसह मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या

IRCTC Credit Card | indian railways irctc npci bank of baroda arm launch co branded credit card for railway customers

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – IRCTC Credit Card | रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे (Good News For Railway Passenger) . भारतीय रेल्वेच्या कॅटरिंग आणि तिकीट युनिट (IRCTC) ने आपल्या वापरकर्त्यांसाठी को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड (IRCTC Co-Branded Credit Card) लाँच केले आहे. हे NPCI आणि BOB फायनान्शियल सोल्युशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने लाँच करण्यात आले आहे. या कार्डमुळे प्रवाशांना अनेक फायदे मिळणार आहेत. दररोज 6 कोटीपेक्षा जास्त वापरकर्ते आयआरसीटीसी वेबसाइटवर रेल्वे तिकीट बुक करतात. (IRCTC Credit Card)

आयआरसीटीसीने माहिती दिली
आयआरसीटीसी अधिकार्‍यांनी सांगितले की, IRCTC BoB RuPay कॉन्टॅक्टलेस क्रेडिट कार्डचा विशेषत: भारतीय रेल्वेमध्ये सातत्याने प्रवास करणार्‍या प्रवाशांना फायदा होईल. अशा प्रवाशांसाठी हे खास तयार करण्यात आले आहे. BOB Financial Solutions Limited (BFSL) ही बँक ऑफ बडोदा (BOB) ची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे.

या क्रेडिट कार्डद्वारे मिळतील हे जबरदस्त फायदे
ग्राहक या क्रेडिट कार्डचा (Credit Card) वापर इंधन, किराणा सामान तसेच इतर गोष्टींसाठी करू शकतात.

हे कार्ड जेसीबी नेटवर्कद्वारे (JCB Network) आंतरराष्ट्रीय व्यापारी आणि ATM मध्ये व्यवहार करण्यासाठी वापरले जाऊ शकते.

आयआरसीटीसी वेबसाइट (IRCTC Website) किंवा मोबाइल अ‍ॅपद्वारे (Mobile App) या क्रेडिट कार्डद्वारे 1AC, 2AC, 3AC, CC, EC बुकिंग करणार्‍या वापरकर्त्यांना 40 रिव्हॉर्ड पॉईंट्स (per Rs 100 spent) मिळतील.

हे कार्ड (IRCTC Credit Card ) सर्व रेल्वे तिकीट बुकिंगवर 1% व्यवहार शुल्क माफी देखील देते.

कार्ड जारी केल्याच्या 45 दिवसांच्या आत 1,000 रुपये किंवा त्याहून जास्त सिंगल खरेदी करणार्‍यांना 1,000 बोनस रिव्हॉर्ड पॉईंट देखील मिळतील.

हे कार्ड वापरून, तुम्हाला किराणा (Grocery Shop) आणि डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये (Department Stores) चार रिव्हॉर्ड पॉईंट्स (per Rs 100 spent) आणि इतर श्रेणींमध्ये दोन रिव्हॉर्ड पॉईंट मिळतील.

कार्डहोल्डर पार्टनर दरवर्षी रेल्वे लाऊंजला चार वेळा मोफत भेट देऊ शकतील. याद्वारे, ग्राहकांना भारतातील सर्व पेट्रोल पंपांवर (Petrol Pump) एक टक्के इंधन अधिभार माफी देखील मिळेल.

Web Title :- IRCTC Credit Card | indian railways irctc npci bank of baroda arm launch co branded credit card for railway customers

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Pune Crime | वडगाव शेरी येथील ‘वॉटर बे’च्या मागील मैदानात तरुणावर कोयत्याने वार; तिघा सराईत गुंडांसह 6 जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल

White Hair Problem | पांढर्‍या केसांच्या समस्येवर रामबाण उपचार, घरातच करा ‘हे’ 3 महत्वाचे उपाय, जाणून घ्या

Pune Crime | कोथरूडमधील 23 वर्षीय तरूणाने बनवले कर्वेनगरमधील 21 वर्षीय तरूणीचे इंस्टाग्रामवर फेक अकाऊंट; अश्लिल मेसेज नातेवाईकांना पाठवून विनयभंग

The post IRCTC Credit Card | रेल्वेने लाँच केले क्रेडिट कार्ड ! तिकिट बुकिंगमध्ये डिस्काऊंटसह मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article