Header

Pune Crime | वडगाव शेरी येथील ‘वॉटर बे’च्या मागील मैदानात तरुणावर कोयत्याने वार; तिघा सराईत गुंडांसह 6 जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल

Pune Crime | वडगाव शेरी येथील ‘वॉटर बे’च्या मागील मैदानात तरुणावर कोयत्याने वार; तिघा सराईत गुंडांसह 6 जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल

Pune Crime | Young man stabbed near Waterbay Society at Wadgaon Sheri A case has been registered against a gang of 6 persons including three goons in yerwada police station

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | भावाला शिवीगाळ केल्याच्या रागातून सराईत गुंडांच्या टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Kill) केला. येरवडा पोलिसांनी (Yerwada Police) तिघा सराईत गुंडांसह ६ जणांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

आदिल सय्यद (वय २२), संकेत थेऊरकर (वय १८), आतिश डिंगरे (वय २०), रोहित धाडवे (वय १८), अजय साळवे (वय २०), आदित्य कांबळे (वय २०, सर्व रा. वडगाव शेरी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. आदिल सय्यद, आतिश डिंगरे आणि रोहित धाडवे हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील (Pune Criminals) गुन्हेगार आहे. (Pune Crime)

याप्रकरणी सईद जाकीर शेख (वय २५, रा. वडगाव शेरी) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद दिली आहे. ही घटना वडगाव शेरी (Wadgaon Sheri) येथील वॉटर बे सोसायटीच्या (Waterbay Society) मागील मैदानात रविवारी रात्री सव्वादहा वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व संकेत थेऊरकर याच्याबरोबर वाद झाला होता. त्यावेळी शेख यांनी त्याला शिवीगाळ केली होती.
शेख हे मोटारसायकलवरुन घरी जात असताना टोळक्याने त्यांना अडविले.
आदिल सय्यद याने काल तू संकेत यास शिवीगाळ केली़ तो माझा भाऊ आहे,

तुला बघुन घेतो, असे बोलून फिर्यादीला शिवीगाळ केली. इतर आरोपींनी फिर्यादीस जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयता नाकावर, कपाळावर मारुन गंभीर जखमी केले आहे. जाताना कोयते हवेत फिरवून लोकांमध्ये दहशत निर्माण केली. सहायक पोलीस निरीक्षक करपे अधिक तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Young man stabbed near Waterbay Society at Wadgaon Sheri A case has been registered against a gang of 6 persons including three goons in yerwada police station

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

White Hair Problem | पांढर्‍या केसांच्या समस्येवर रामबाण उपचार, घरातच करा ‘हे’ 3 महत्वाचे उपाय, जाणून घ्या

Pune Crime | कोथरूडमधील 23 वर्षीय तरूणाने बनवले कर्वेनगरमधील 21 वर्षीय तरूणीचे इंस्टाग्रामवर फेक अकाऊंट; अश्लिल मेसेज नातेवाईकांना पाठवून विनयभंग

Pune Police | …म्हणून पुण्यातील ‘त्या’ पोलिस निरीक्षकास केले महिन्याभरासाठी कंट्रोल रूमशी ‘संलग्न’; पोलिस आयुक्त व सह आयुक्तांच्या कठोर कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले

The post Pune Crime | वडगाव शेरी येथील ‘वॉटर बे’च्या मागील मैदानात तरुणावर कोयत्याने वार; तिघा सराईत गुंडांसह 6 जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article