Header

Kirit Somaiya in Pune | पुण्यात भाजप नेते किरीट सोमय्यांना धक्काबुक्की; प्रचंड खळबळ (व्हिडीओ)

Kirit Somaiya in Pune | पुण्यात भाजप नेते किरीट सोमय्यांना धक्काबुक्की; प्रचंड खळबळ (व्हिडीओ)

Kirit Somaiya in Pune | shivsena supporters aggressive against BJP leader kirit somaiya in pune corporation

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Kirit Somaiya in Pune | भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे महाविकास आघाडी सरकारमधील (Maha Vikas Aghadi Government) नेते आणि मंत्र्यावर सतत आरोप करताना आपणा सर्वांना पहावयास मिळतात. दरम्यान आज (शनिवारी) किरीट सोमय्या हे पुणे दौऱ्यावर (Pune Tour) होते. महानगरपालिकेच्या जम्बो कोविड रुग्णालयाच्या (PMC Jumbo Covid Hospital) कामात भ्रष्टाचारा बाबत महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यासाठी पुणे महानगरपालिकेमध्ये (Pune Corporation) आलेल्या सोमय्या यांच्यासमोर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत धक्काबुक्की केली. त्यामुळे पालिकेसमोर राडा पाहायला मिळाला. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. (Kirit Somaiya in Pune)

सोमय्या सायंकाळी साडे चारच्या सुमारास महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांना निवेदन देण्यासाठी येणार होते याची कुणकुण लागताच जवळपास शंभर शिवसैनिक (Shiv Sainik In Pune) महापालिकेमध्ये काही काळ आधी उपस्थित होते. सोमय्या हे नवीन प्रशासकीय इमारतीतील गेटने महापालिकेत (PMC Bhavan) येणार असल्याची माहिती समजताच शिवसैनिक घोषणाबाजी करत नवीन इमारतीकडे वळले. त्यानंतर किरीट सोमय्या (Kirit Somaiya in Pune) यांची गाडी जुन्या इमारतीच्या दिशेने आली. सोमय्या गाडीतून उतरून आयुक्तांना भेटण्यासाठी जात असताना 3-4 शिवसैनिकांनी त्यांना अडवून विचारणा केली.

“तुम्ही पुणे महापालिकेतील भ्रष्टाचाराबद्दल (Corruption in PMC) का बोलत नाहीत, सेलेक्टिव्ह प्रकरणावर काय चर्चा करता” असा जाब शिवसैनिकांनी विचारला. “मला माहिती द्या मी त्याबद्दल ही प्रशासनाशी बोलतो” असं सोमय्या म्हणाले. दरम्यान त्यावेळी नव्या प्रशासकीय इमारती कडून शिवसैनिक घोषणाबाजी करत किरीट सोमय्या यांच्याकडे आले. सुरक्षारक्षकांनी त्यांना घेराव घालून सोमय्या यांना बचावण्याचा प्रयत्न केला. मात्र, आक्रमक झालेले शिवसैनिक तुटून पडले सोमय्या यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेताच सुरक्षा रक्षकांनी त्यांना गाडीत बसविले. त्यावेळी घोषणाबाजी देखील झाली. त्यावेळी पालिकेसमोर गदारोळ माजला होता.

दरम्यान, सोमय्या यांना गाडीत बसू देण्यासही शिवसैनिकांनी विरोध केला. त्यांच्या सुरक्षारक्षकांना ही धक्काबुक्की केली गेलीय. त्यावेळी कसतरी सोमय्या यांची गाडी महापालिकेतून बाहेर जात असताना शिवसैनिकांनी जोरात काचेवर, बॉनेटवर हाताने मारून गाडी रोखण्याचा प्रयत्न केला. बाहेर जातानाच्या गेटवर काही काळ त्यांची गाडी थांबविण्यात आली होती. दरम्यान, सुरक्षारक्षकांनी वाट रिकामी करून किरीट सोमय्या यांना महापालिकेतून बाहेर काढले. या प्रसंगामुळे काही काळ पालिकेत तणावाची स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, शिवसैनिकांकडून सोमय्यांना धक्काबुक्की झाल्याची जोरदार चर्चा राजकीय वुर्तळात आहे.

Web Title :- Kirit Somaiya in Pune | shivsena supporters aggressive against BJP leader kirit somaiya in pune corporation

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

Maharashtra Women’s Policy | नव्या महिला धोरणाची घोषणा जागतिक महिला दिनी होणार; ठाकरे सरकारचा निर्णय

Multibagger Stocks | मल्टीबॅगर स्टॉकद्वारे करोडपती बनायचे आहे का? ‘या’ 7 गोष्टी लक्षात ठेवून शोधा हजारो पट रिटर्न देणारे मल्टीबॅगर शेयर

Pune Crime | दुर्देवी ! शिकारीसाठी वापरल्या जाणाऱ्या बॉम्बच्या स्फोटात 6 वर्षीय मुलगी जागीच ठार, 2 मुले गंभीर जखमी

The post Kirit Somaiya in Pune | पुण्यात भाजप नेते किरीट सोमय्यांना धक्काबुक्की; प्रचंड खळबळ (व्हिडीओ) appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article