Header

Pune Corona Update | पुणेकरांना मोठा दिलासा ! गेल्या 24 तासात कोरोनाच्या नव्या रूग्णसंख्येच्या तुलनेत बर्‍या होणार्‍यांची संख्या तिप्पटीपेक्षा जास्त

Pune Corona Update | पुणेकरांना मोठा दिलासा ! गेल्या 24 तासात कोरोनाच्या नव्या रूग्णसंख्येच्या तुलनेत बर्‍या होणार्‍यांची संख्या तिप्पटीपेक्षा जास्त

Pune Corona Update | Great relief to the people of Pune! More than triple the number of new corona outbreaks in the last 24 hours

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Corona Update | कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव बर्‍यापैकी कमी होत असताना समोर आलेल्या आकडेवारीवरून दिसत आहे. पुण्यात कोरोनाच्या रूग्ण संख्येत झपाटयाने घट होत असल्याचे सध्या चित्र आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरात कोरोनाच्या नव्या रूग्णांच्या तुलनेत बरे होणार्‍यांची संख्या तिप्पटीपेक्षा जास्त आहे. दिवसभरात कोरोनाचे 1 हजार 490 नवे रूग्ण आढळून आले आहेत तर तब्बल 5 हजार 410 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. (Pune Corona Update)

पुण्यात दिवसभरात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुणे शहरातील 9 जणांचा तर पुण्याबाहेरील 6 जणांचा समावेश आहे. पुण्यातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या आता 6 लाख 50 हजार 82 वर गेली आहे. त्यामध्ये सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 6 लाख 23 हजार 970 रूग्ण हे कोरोनातून बरे झाले आहेत. त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज दिवसभरात 8 हजार 883 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी 1 हजार 490 जणांचा कोरोनाचा अहवाल सकारात्मक आला आहे.

पुण्यात सध्या कोरोनाचे 16 हजार 823 अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत (Pune Corona Update). पुणे शहरात आजपर्यंत कोरोनामुळं तब्बल 9 हजार 289 जणांचा मृत्यू झाला आहे. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 243 रूग्णांवर ऑक्सिजन देवुन उपचार सुरू आहेत. त्यापैकी 50 जण इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर तर 26 जण नॉन इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर आहेत.

Web Title :- Pune Corona Update | Great relief to the people of Pune! More than triple the number of new corona outbreaks in the last 24 hours

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

Kirit Somaiya in Pune | पुण्यात भाजप नेते किरीट सोमय्यांना धक्काबुक्की; प्रचंड खळबळ (व्हिडीओ)

Maharashtra Women’s Policy | नव्या महिला धोरणाची घोषणा जागतिक महिला दिनी होणार; ठाकरे सरकारचा निर्णय

Multibagger Stocks | मल्टीबॅगर स्टॉकद्वारे करोडपती बनायचे आहे का? ‘या’ 7 गोष्टी लक्षात ठेवून शोधा हजारो पट रिटर्न देणारे मल्टीबॅगर शेयर

Pune Crime | दुर्देवी ! शिकारीसाठी वापरल्या जाणाऱ्या बॉम्बच्या स्फोटात 6 वर्षीय मुलगी जागीच ठार, 2 मुले गंभीर जखमी

Pune Crime | पुण्यात पत्नीच्या मदतीने 27 वर्षाच्या तरुणीचे न्यूड फोटो व्हायरल करुन बदनामी अन् बलात्कार; पाषाण परिसरातील घटना

The post Pune Corona Update | पुणेकरांना मोठा दिलासा ! गेल्या 24 तासात कोरोनाच्या नव्या रूग्णसंख्येच्या तुलनेत बर्‍या होणार्‍यांची संख्या तिप्पटीपेक्षा जास्त appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article