Header

Kirit Somaiya | पुण्यातील कोविड सेंटरचं कंत्राट चहावाल्याला ! किरीट सोमय्या थेट मुंबईच्या चहावाल्याच्या दुकानात; उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले…

Kirit Somaiya | पुण्यातील कोविड सेंटरचं कंत्राट चहावाल्याला ! किरीट सोमय्या थेट मुंबईच्या चहावाल्याच्या दुकानात; उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले…

Kirit Somaiya | kirit somaiya found hotel owner whom jumbo covid center contract was given somaiya visits hotel near KEM hospital mumbai

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Kirit Somaiya | काही दिवसांपुर्वी भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पुण्यातील जम्बो कोविड सेंटर बाबत (PMC Jumbo Covid Hospital) आरोप केले होते. त्यावेळी सोमय्यांनी जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट चहावाल्याला दिल्याचा आरोप केला होता. यानंतर आता किरीट सोमय्यांनी त्या चहावाल्याला शोधून काढलं आहे. चहावाल्याचा शोध घेत सोमय्या मुंबईच्या (Mumbai) केईएम रुग्णालय समोरील एका हॉटेलमध्ये दाखल होऊन हॉटेलची पाहणी केली आहे.

‘पुण्यातील जम्बो कोविड सेंटरचे 100 कोटींचे कंत्राट मुंबईतील सह्याद्री हॉटेल मालकाला देण्यात आले. राजीव साळुंखे (Rajiv Salunkhe) यांच्या नावे हॉटेल आहे. ठाकरे सरकारने (Thackeray Government) जम्बो कोविड सेंटरप्रकरणी घोटाळा केला आहे.’ असं किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) सांगितलं.

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

सोमय्या यांनी आज मुंबईत परळमधल्या हॉटेलमध्ये सरप्राईज भेट दिली. परळमधील या चहावालाच्या सह्याद्री हॉटेलमध्ये पोहोचले. आणि हॉटेलमालकाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हॉटेलचा मालक तिथे हजर नव्हता. यानंतर सोमय्या माध्यमांशी संवाद साधून काही वेळानंतर तिथून निघाले. दरम्यान, किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठकरेंवर (CM Uddhav Thackeray) निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका चहावाल्याला जम्बो कोविड सेंटरचे 100 कोटींचे कंत्राट दिल्याचा आरोप त्यांनी केला.
पुण्यातील कंत्राट मुंबईतील एका चहावाल्याला दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले…

‘पुण्यात एक आणि पिंपरी-चिंचवडमधे एक असे 2 जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले होते. या सेंटरच्या व्यवस्थापनात कोणतीही राजकीय व्यक्ती नव्हती तर, सगळी जबाबदारी पालिका आणि पीएमआरडीए अधिकाऱ्यांवर होती. मात्र या जम्बो कोविड सेंटर बाबत आरोप होत असल्याने पीएमआरडीएच्या आयुक्तांना याबाबत माहिती काढायला सांगितली आहे.’
असं अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

Web Title :- Kirit Somaiya | kirit somaiya found hotel owner whom jumbo covid center contract was given somaiya visits hotel near KEM hospital mumbai

 

 

Pune Crime | पुण्यात जन्मदात्या बापानेच केला आपल्या 16 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेच्या नजरेमुळे आला प्रकार उघडकीस

Tejasswi Prakash | बिग बॉसच्या घरात शारिरीक संबंध न ठेवताच अभिनेत्री प्रेग्नेंट; जाणून घ्या प्रकरण

Weight Loss | रात्री ‘हे’ काम करून सुद्धा कमी करू शकता वजन, आहे खुप सोपे

The post Kirit Somaiya | पुण्यातील कोविड सेंटरचं कंत्राट चहावाल्याला ! किरीट सोमय्या थेट मुंबईच्या चहावाल्याच्या दुकानात; उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले… appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article