Header

Pune Crime | पुण्यात जन्मदात्या बापानेच केला आपल्या 16 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेच्या नजरेमुळे आला प्रकार उघडकीस

Pune Crime | पुण्यात जन्मदात्या बापानेच केला आपल्या 16 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेच्या नजरेमुळे आला प्रकार उघडकीस

Pune Crime | Pune born father sexually abuses his 16 year old daughter; The teacher's gaze revealed the type

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | नेहमी अभ्यास करणारी मुलगी आता अभ्यास करत नाही. वर्गात कोणाशी बोलत नाही, वर्गात एकदम शांत रहात असल्याचे तिच्या शिक्षिकेला जाणवले. त्यांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यातून जन्मदाता पिताच तिच्यावर गेल्या दोन वर्षांपासून लैंगिक अत्याचार (Rape In Pune) करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. (Pune Crime)

याप्रकरणी मुख्याध्यापिकांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Raod Police) फिर्याद दिली. त्यावरुन पोलिसांनी ४५ वर्षाच्या बापाला अटक केली आहे. हा प्रकार २०१९ ते ८ फेब्रुवारी २०२२ दरम्यान वारंवार घडला आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित १६ वर्षाची मुलगी धायरीतील (Dhayari) एका शाळेत इयत्ता १० वीच्या वर्गात शिकत आहे. ही मुलगी राहते घरात एकटी असल्याचा फायदा घेऊन तिचे ओठांची पप्पी घेऊन तिच्या वडिलांनी तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. त्याला विरोध केल्यावर तिला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तिला हाताने मारहाण करुन उजवे हाताला दुखापत केली आहे. (Pune Crime)

मुख्याध्यापिका यांना ही बाब समजताच त्यांनी तातडीने सिंहगड रोड पोलीस ठाण्याशी संपर्क साधून फिर्याद दिली. पोलिसांनी बापाला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक खेडकर (PSI Khedekar) अधिक तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Pune born father sexually abuses his 16 year old daughter; The teacher’s gaze revealed the type

 

Tejasswi Prakash | बिग बॉसच्या घरात शारिरीक संबंध न ठेवताच अभिनेत्री प्रेग्नेंट; जाणून घ्या प्रकरण

Pune International Airport Lohegaon | पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुटामधून सोन्याच्या बिस्कीटांची तस्करी, 35 लाखांचे सोने जप्त

Multibagger Stocks | 10 हजारांचे झाले 36 लाख; दोन रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या स्टाॅकने करून दिली कमाई, जाणून घ्या

The post Pune Crime | पुण्यात जन्मदात्या बापानेच केला आपल्या 16 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेच्या नजरेमुळे आला प्रकार उघडकीस appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article