Header

Lata Mangeshkar Net Worth | सध्या रूग्णालयात उपचार घेत असलेल्या लता मंगेशकर यांची संपत्ती किती आहे? जाणून घ्या

Lata Mangeshkar Net Worth | सध्या रूग्णालयात उपचार घेत असलेल्या लता मंगेशकर यांची संपत्ती किती आहे? जाणून घ्या

Lata Mangeshkar Net Worth | lata mangeshkar net worth know about property

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Lata Mangeshkar Net Worth | वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी आपल्या संगीत कलेच्या करीअरची वाट धरलेल्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) उपचार घेत आहेत. सध्या लता मंगेशकर या 93 वर्षाच्या आहेत. लतादीदींना कोरोना आणि न्यूमोनिया झाल्याने मागील अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्यांच्या प्रकृतीबाबत वेगवेगळे अपडेट येत आहेत. त्यांच्या तब्येतीत लवकर सुधार व्हावा यासाठी चाहत्यांकडून प्रार्थना करीत आहेत. (Lata Mangeshkar Net Worth)

लता मंगेशकर गाण्यासाठी जगभर प्रसिद्ध आहेत. दरम्यान, लतादीदींची एकूण संपत्ती किती आहे. याबाबत तुम्हाला माहिती आहे का? तर लतादीदींची एकूण संपत्ती 368 कोटी रुपये आहे. 28 सप्टेंबर रोजी जन्मलेल्या लता मंगेशकर यांनी आपल्या आवाजाने सगळ्या जगात आपला एक वेगळा ठसा उमटविला आहे. गोड आवाजातील गाणी रसिकांच्या कायम स्मरणात राहतील अशी ओळख त्यांची आहे. लतादीदींनी जगभरातील 36 भाषांमध्ये 50 हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. आपल्या आवाजाच्या माध्यमातून भारताचे नाव जगात उंचावणाऱ्या लतादीदींनी भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार (Bharat Ratna Award) संपादन केला आहे. (Lata Mangeshkar Net Worth)

लतादीदींचे वडील दीनानाथ मंगेशकर (Deenanath Mangeshkar) हे मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध संगीतकार, शास्त्रीय गायक आणि नाट्य अभिनेते होते, तर आई गुजराती होती. लतादीदींनी लहानपणापासूनच वडिलांकडून संगीताचे धडे घेतले होते. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे लतादीदींना लहान वयातच घराची आर्थिक जबाबदारी पेलली. यासाठी त्यांनी गाणी गाण्यास सुरुवात केली आहे. तसेच, मराठी, हिंदी चित्रपटात गाणी गाण्याची संधी मिळावी यासाठी त्या धडपडत राहिल्या.

लतादीदींना पहिली संधी 1942 साली ‘किती हसाल’ या मराठी चित्रपटातील गाण्यानं मिळाली. तर पहिली मंगळागौर या चित्रपटात त्यांनी अभिनयही केला होता. त्यांना मास्टर गुलाम हैदर यांच्या ‘मजबूर’ चित्रपटातील ‘इंग्लिश छोरा चला गया’ या गाण्यात प्रसिद्ध गायक मुकेशसोबत गाण्याची संधी मिळाली. दरम्यान, लतादीदींना पहिल्या गाण्यासाठी मानधन मिळालं होतं ते होतं केवळ 25 रुपये मिळाले होते.

आज त्यांची संपत्ती काही कोटींच्या घरात आहे. Trustednetworth . com च्या अहवालानुसार, लतादीदी यांची एकूण संपत्ती सुमारे 5 कोटी डॉलर्स इतकी आहे म्हणजेच अंदाजे 368 कोटी रुपये आहे. गाण्यांच्या रॉयल्टीतून आणि अन्य गुंतवणुकीतून त्यांची ही संपत्ती निर्माण झाली आहे. लतादीदी यांचे दक्षिण मुंबईतील पेडर रोडवर प्रभु कुंज भवन (Prabhu Kunj Bhavan) नावाचे घर आहे. या घराची किंमत करोडोंमध्ये आहे.

Web Title :- Lata Mangeshkar Net Worth | lata mangeshkar net worth know about property

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

Pune Corona Update | पुणेकरांना मोठा दिलासा ! गेल्या 24 तासात कोरोनाच्या नव्या रूग्णसंख्येच्या तुलनेत बर्‍या होणार्‍यांची संख्या तिप्पटीपेक्षा जास्त

Kirit Somaiya in Pune | पुण्यात भाजप नेते किरीट सोमय्यांना धक्काबुक्की; प्रचंड खळबळ (व्हिडीओ)

Maharashtra Women’s Policy | नव्या महिला धोरणाची घोषणा जागतिक महिला दिनी होणार; ठाकरे सरकारचा निर्णय

The post Lata Mangeshkar Net Worth | सध्या रूग्णालयात उपचार घेत असलेल्या लता मंगेशकर यांची संपत्ती किती आहे? जाणून घ्या appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article