Header

Nilesh Rane | भाजप नेते निलेश राणे यांच्यावर FIR

Nilesh Rane | भाजप नेते निलेश राणे यांच्यावर FIR

Nilesh Rane | a case has been registered against bjp leader nilesh rane

सिंधुदुर्ग : बहुजननामा ऑनलाइन – Nilesh Rane | न्यायालयाच्या परिसरात हुज्जत घातल्या प्रकरणी भाजपचे माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांच्यासह भाजपच्या अन्य पाच जणांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा सिंधुदुर्ग नगरी पोलीस ठाण्यात (Sindhudurg Nagari Police Station) रात्री उशिरा दाखल झाला आहे. त्यामुळे आता निलेश राणे अडचणीच्या भोव-यात सापडले आहेत.

काल (मंगळवारी) भाजपचे आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांच्या सुनावणीनंतर न्यायालयाबाहेर जमाव केल्याप्रकरणी आणि पोलिसांशी हुज्जत, शांततेचा भंग केल्याप्रकरणी निलेश राणे (Nilesh Rane) यांच्यासह भाजपच्या अन्य 5 जणांवर गुन्हे (FIR) दाखल करण्यात आले आहेत. व्हिडीओ शूटिंग बघून इतर जणांवर देखील गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार अथवा त्यापेक्षा अधिक जमाव केल्याप्रकरणी आणि जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे. सिंधुदुर्ग नगरी पोलीस ठाण्यात (Sindhudurg Nagari Police Station) काल (मंगळवारी) रात्री गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने (Sindhudurg District Sessions Court) जामीन अर्ज नाकारल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी मुंबई हाय कोर्टात (Mumbai High Court) धाव घेतली आहे. आज (बुधवारी) केसची नोंदणी होऊन प्राथमिक सुनावणी हाय कोर्टात होण्याची शक्यता आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या खुनाच्या प्रयत्नातील मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप नितेश राणे यांच्यावर आहे. याप्रकरणी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने काल त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. यामुळे नितेश राणे यांनी मुंबई हाय कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे.

Web Title :- Nilesh Rane | a case has been registered against bjp leader nilesh rane

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

Corporator Keshav Gholve | खंडणी प्रकरणी माजी उपमहापौर आणि भाजपाचे विद्यमान नगरसेवक केशव घोळवे यांच्यासह तिघांना मध्यरात्री अटक

MLA Nitesh Rane | आमदार नितेश राणेंना आणखी एक झटका, मुंबई हायकोर्टानं दिले महत्वाचे आदेश

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचे दर

Anti Corruption Bureau (ACB) Mumbai | अ‍ॅन्टी करप्शनने परमबीर सिंह यांची केली 2 तास चौकशी; पोलीस निरीक्षक अनुप डांगे प्रकरणात नोंदविला जबाब

Pune Crime | 10 वर्षाच्या मुलीला घरात बोलावून केला बलात्कार ; कोंढव्यातील धक्कादायक घटना

The post Nilesh Rane | भाजप नेते निलेश राणे यांच्यावर FIR appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article