Header

Power Failure Mumbai Local Trains | मुंबईतील अनेक भागातील वीज ‘गुल’;उपनगरीय रेल्वे सेवेवर परिणाम

Power Failure Mumbai Local Trains | मुंबईतील अनेक भागातील वीज ‘गुल’;उपनगरीय रेल्वे सेवेवर परिणाम

power failure in many parts of mumbai local trains affected

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Power Failure Mumbai Local Trains | नेहमी घड्याळाच्या काट्यावर धावणार्‍या मुंबईत (Mumbai News) सुरळीत वीज पुरवठा (Power Supply) अतिशय महत्वाचा ठरतो. मुलुंड ते ट्रॉम्बे (Mulund To Trombay) दरम्यानच्या वीज वितरण कंपनीच्या 220 केव्ही लाईनमध्ये दोष निर्माण झाल्याने मुंबईतील उपनगरांमध्ये रविवारी सकाळी वीज पुरवठा खंडीत (Power Outage) झाला. याचा परिणाम उपनगरीय लोकल सेवेवरही झाला आहे. (Power Failure Mumbai Local Trains)

सकाळी 9 वाजून 49 मिनिटांनी वीज पुरवठा खंडीत झाला होता. दक्षिण मुंबई (South Mumbai), दादर (Dadar) या भागासह अनेक भागातील वीज पुरवठा खंडीत झाला. त्याचा परिणाम मुंबई सेंट्रल (Mumbai Central) ते विले पार्ले (Vile Parle) आणि चर्चगेट (Churchgate) ते अंधेरी (Andheri) या मार्गावरील उपनगरीय लोकलवर (Mumbai Local Trains) झाला आहे. अनेक लोकल जागेवरच थांबल्या. त्यामुळे लोकलमधील प्रवाशांना नेमके काय झाले, हे प्रथम समजू शकले नाही. लोकलमधील पंखे, दिवे बंद झाल्याने वीज पुरवठा खंडीत झाल्याचे लक्षात आले. काही मिनिटांनी हा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला असून आता मुंबई सेंट्रल ते विले पार्ले दरम्यानची लोकल सेवा पूर्ववत करण्यात आली आहे.

रविवार असल्याने नेहमीपेक्षा आज लोकलला गर्दी कमी होती. मात्र, काही वेळासाठी वीज गुल झाल्याने मुंबईच्या बहुसंख्य नागरिकांना (Mumbaikars) याचा त्रास सहन करावा लागला.

Web Title :-  power failure in many parts of mumbai local trains affected

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा


Pune Crime | येरवडा कारागृहात जेल पोलीसाचा गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न; ससूनमध्ये उपचार सुरू

Weight Loss Hacks | तांदूळ शिजवताना पातेल्यात एक चमचा टाका ‘ही’ गोष्ट, आपोआप कमी होईल पूण शरीरातील चरबी

IPS Rashmi Shukla | तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शक्ला यांच्यावर पुण्यात टेलिग्राफ अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल; पुणे पोलिसांनी दिली ‘ही’ माहिती

Avoid These 6 Foods in Lunch | सावधान ! लंचमध्ये चुकूनही घेऊ नका ‘या’ 6 गोष्टी, सेवन केल्याने येतो आळस; आजारी सुद्धा पडू शकता

The post Power Failure Mumbai Local Trains | मुंबईतील अनेक भागातील वीज ‘गुल’;उपनगरीय रेल्वे सेवेवर परिणाम appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article