Header

Pune Crime | 10 वर्षाच्या मुलीला घरात बोलावून केला बलात्कार ; कोंढव्यातील धक्कादायक घटना

Pune Crime | 10 वर्षाच्या मुलीला घरात बोलावून केला बलात्कार ; कोंढव्यातील धक्कादायक घटना

Pune Crime | 10 year old girl raped after being called home; Shocking incident in Kondhwa

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | शेजारी राहणार्‍या १० वर्षाच्या मुलीला दुकानातून पत्ते आणायला सांगून, ती पत्ते घेऊन आल्यावर तिला घरात घेऊन तिच्यावर बलात्कार (Rape In Pune) करण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Pune Crime)

याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) लक्ष्मीनगरमधील (Laxmi Nagar, Kondhwa) एका ३५ वर्षाच्या नराधमावर पोक्सो अंतर्गत (POCSO Act ) गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका २८ वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. ही घटना १ फेब्रुवारी रोजी पावणे बारा ते दुपारी दीड दरम्यान घडली. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा लक्ष्मीनगरमध्ये रहायला आहे. त्यांच्या गल्लीत राहणार्‍या एका १० वर्षाच्या मुलीला त्याने दुकानातून पत्ते आणायला सांगितले. तिने पत्ते आणून त्याच्याकडे देत असताना त्याने तिचा हात पकडला व तिला घरात ओढून घेतले. दाराला आतून कडी लावून तिचे कपडे काढून तिच्यावर जबरदस्तीने शारीरीक संबंध केला. या मुलीने हा प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक मधाळे (API Madhale) तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | 10 year old girl raped after being called home; Shocking incident in Kondhwa

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

Aadhaar Update | ‘वन नेशन वन रजिस्ट्रेशन’ अंतर्गत आता जमीनीचा सुद्धा असेल ‘आधार’ नंबर, जाणून घ्या काय होतील फायदे

Maharashtra Temperature | राज्यात धुक्यासह थंडीचा कडाका ! जळगावात तापमान 7 अंशावर, पुण्यात पारा घसरला

Ajit Pawar | ‘अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं ते शोधून सापडणार नाही’, अजीत पवारांची टीका

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 14,372 नवीन रुग्णांचे निदान; जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | 300 कोटीची क्रिप्टो करन्सी व पैशांच्या हव्यासापोटी अपहरण; खंडणी मागणाऱ्या मुख्य सुत्रधार पोलिसासह 8 जणांना अटक

The post Pune Crime | 10 वर्षाच्या मुलीला घरात बोलावून केला बलात्कार ; कोंढव्यातील धक्कादायक घटना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article