Header

Anti Corruption Bureau (ACB) Mumbai | अ‍ॅन्टी करप्शनने परमबीर सिंह यांची केली 2 तास चौकशी; पोलीस निरीक्षक अनुप डांगे प्रकरणात नोंदविला जबाब

Anti Corruption Bureau (ACB) Mumbai | अ‍ॅन्टी करप्शनने परमबीर सिंह यांची केली 2 तास चौकशी; पोलीस निरीक्षक अनुप डांगे प्रकरणात नोंदविला जबाब

Anti Corruption Bureau (ACB) Mumbai | Anti Corruption interrogates Parambir Singh for 2 hours in Police Inspector Anup Dange reported the case

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Anti Corruption Bureau (ACB) Mumbai | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Mumbai) तब्बल २ तास चौकशी करीत जबाब नोंदवून घेतला. त्यांच्याविरुद्ध पोलीस निरीक्षक अनुप डांगे (Police Inspector Anup Dange) यांनी भष्ट्राचाराची तक्रार केली होती.

पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांना निलंबित करण्यात आले होते. त्यांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी सिंह यांनी डांगे यांच्याकडे दोन कोटींची मागणी केली होती, अशी तक्रार डांगे यांनी केली होती. याप्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर सरकारने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला या प्रकरणाची खुली चौकशी (Open Inquiry) करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने यापूर्वी परमबीर सिंह यांना १० व १८ जानेवारी रोजी समन्स बजावण्यात आले होते.

मात्र, सर्वोच्च न्यायालयातील कामकाजामुळे ते त्यावेळी हजर राहिले नव्हते. त्यानंतर त्यांना आज २ फेब्रुवारी रोजी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आज तारीख असल्याने ते मंगळवारी १ फेब्रुवारी रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात हजर झाले होते. तेथे त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला. आपल्या जबाबात त्यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळल्याचे सांगण्यात येते.

सुमारे २ तास जबाब नोंदविल्यानंतर परमबीर सिंह हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयातून बाहेर पडले. गरज पडल्यास त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते, अशी माहिती एसीबीकडून (ACB Mumbai) देण्यात आली.


Web Title :-
Anti Corruption Bureau (ACB) Mumbai | Anti Corruption interrogates Parambir Singh for 2 hours in Police Inspector Anup Dange reported the case

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

Pune Crime | 10 वर्षाच्या मुलीला घरात बोलावून केला बलात्कार ; कोंढव्यातील धक्कादायक घटना

Aadhaar Update | ‘वन नेशन वन रजिस्ट्रेशन’ अंतर्गत आता जमीनीचा सुद्धा असेल ‘आधार’ नंबर, जाणून घ्या काय होतील फायदे

Maharashtra Temperature | राज्यात धुक्यासह थंडीचा कडाका ! जळगावात तापमान 7 अंशावर, पुण्यात पारा घसरला

The post Anti Corruption Bureau (ACB) Mumbai | अ‍ॅन्टी करप्शनने परमबीर सिंह यांची केली 2 तास चौकशी; पोलीस निरीक्षक अनुप डांगे प्रकरणात नोंदविला जबाब appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article