Header

Pune Crime | दहशत निर्माण करण्यासाठी कोयत्याने केक कापून व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल, अल्पवयीन गुन्हे शाखेच्या ताब्यात

Pune Crime | दहशत निर्माण करण्यासाठी कोयत्याने केक कापून व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल, अल्पवयीन गुन्हे शाखेच्या ताब्यात

Pune Crime | The video went viral on social media cutting the cake with a scythe to create panic Pune Police Detain one boy

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी कोयत्याने वाढदिवसाचा केक कापून हातात कोयता घेऊन नाचण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला गुन्हे शाखेच्या युनिट एकने (Pune Police Crime Branch) ताब्यात घेतले आहे. ही कारवाई सोमवारी (दि.14) लोहियानगर (Lohia Nagar, Pune) येथे (Pune Crime) करण्यात आली.

गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना लोहियानगर भागातील पी. एम. सी. कॉलनी नं. 9 येथे वाढदिवसाचा केक (Birthday Cake) कोयत्याने कापून डीजे लावून नाचण्याचा व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर टाकल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने लोहियानगर येथे पंचासमक्ष छापा टाकून एका विधिसंघर्षीत मुलाला ताब्यात घेऊन 500 रुपयांचा कोयता जप्त केला. अल्पवयीन मुलावर खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) आर्म ॲक्टअंतर्गत (Arm Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

सध्या गुन्हेगार आणि तरुणांमध्ये मध्यरात्रीच्या वेळी चौकामध्ये गर्दी करुन वाढदिवस साजरा करण्याचे प्रकार सुरु आहेत. परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी वाढदिवसाचे केक तलवार, कोयता यासारख्या हत्यारांचा वापर करुन कापले जात आहेत. तसेच त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केले जात आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांकडून (Pune Police) संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे (Senior Police Inspector Shailesh Sankhe), पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड (PSI Sanjay Gaikwad), पोलीस अंमलदार अमोल पवार, इम्रान शेख, महेश बामगुडे, तुषार माळवदकर, अय्याज दड्डीकर यांच्या पथकाने केली.

 

 

Web Title :- Pune Crime | The video went viral on social media cutting the cake with a scythe to create panic Pune Police Detain one boy

 

7th Pay Commission | मोदी सरकार ‘या’ दिवशी देईल फिटमेंट फॅक्टरला मंजूरी ! बेसिक वेतनात होईल 96000 रुपयांची वाढ

 

Pune Crime | घरफोडी करणाऱ्या 3 सराईत गुन्हेगारांना लोणीकाळभोर पोलिसांकडून अटक, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

 

Mumbai Pune Expressway Accident News | मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बोरघाटात ट्रकचा टायर फुटल्याने भीषण अपघात; सोलापूरचे 4 जण जागीच ठार

The post Pune Crime | दहशत निर्माण करण्यासाठी कोयत्याने केक कापून व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल, अल्पवयीन गुन्हे शाखेच्या ताब्यात appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article