Header

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात 964 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात 964 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Corona Update | 964 patients corona free in Pune city in last 24 hours, find out other statistics

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona Update) रुग्ण संख्या कमी होत आहे. मागील काही दिवसांपासून शहरात नवीन रुग्णांची संख्या पाचशेच्या आत आढळून येत आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona Update) 334 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 964 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

शहरातील विविध केंद्रावर आज 3 हजार 818 स्वॅब तपासणी (Swab) करण्यात आली आहे. यामध्ये 334 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोना बाधितांची (Pune Corona Update) संख्या 6 लाख 57 हजार 517 इतकी झाली आहे. यापैकी 6 लाख 43 हजार 932 रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 02 तर हद्दीबाहेरील 03 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 333 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे. पुणे शहरामध्ये सध्या 04 हजार 252 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 191 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर वर 30 तर नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर 20 रुग्ण आहेत. एकूण अ‍ॅक्टिव्ह रुग्णांपैकी 12.90 टक्के रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

 

 

Web Title :- Pune Corona Update | 964 patients corona free in Pune city in last 24 hours, find out other statistics

 

 

Pune Crime | धक्कादायक ! पैसे न दिल्याने 28 वर्षाच्या मुलाने 55 वर्षाच्या आईचा केला विनयभंग

 

HCL Technologies Jobs | HCL करणार बंपर भरती, नवीन आणि अनुभवी दोन्ही उमेदवार करू शकतात अर्ज, जाणून घ्या सविस्तर

 

Tu Tevha Tashi | ‘या’ मराठमोळी अभिनेत्रीचे 20 वर्षांनंतर पुनरागमन; नाव वाचून व्हाल…

The post Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात 964 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article