Header

Pune Crime | पुण्याच्या भोसरीमध्ये लातूरच्या युवकाचा दगडाने ठेचून खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह गॅरेजमध्ये दिला फेकून, परिसरात खळबळ

Pune Crime | पुण्याच्या भोसरीमध्ये लातूरच्या युवकाचा दगडाने ठेचून खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह गॅरेजमध्ये दिला फेकून, परिसरात खळबळ

Pune Crime | Youth of Latur stoned to death in Bhosari Pune To destroy the evidence the bodies were thrown into the garage causing a commotion in the area

पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | भोसरी परिसरातील (Bhosari) धावडेवस्ती येथे एका युवकाच्या डोक्यात दगड घालून दगडाने ठेचून खून (Murder in Pune) करण्यात आला. हा प्रकार (27 जानेवारी) रोजी उघडकीस (Pune Crime) आला. गणेश शिवाजी गडकर (Ganesh Shivaji Gadkar) (रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी. मूळ रा. टाका, पो. ता. औसा, जि. लातूर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या हत्येतील आरोपींना दरोडा विरोधी पथकाने (Anti-Robbery Squad Pimpri) बेड्या ठोकल्या आहेत.

नामदेव शिवाजी शिंदे (Namdev Shivaji Shinde) (वय 24, धावडे वस्ती, भोसरी. मूळ रा. याकतपुर, ता. औसा, जि. लातूर), भारत उर्फ बारक्या भीमराव आडे (Bharat Bhimrao Aade) (वय 22, रा. धावडे वस्ती, भोसरी), आकाश अशोक सरदार (Akash Ashok Sardar) (वय 24, रा. नाणेकरवाडी, चाकण), लक्ष्मण राजू नागोले (Laxman Raju Nagole) (रा. धावडे वस्ती, भोसरी) या आरोपींना पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे.
संबधित आरोपींनी युवकाचा खून करून गॅरेजमध्ये फेकल्याची कबुली दिली आहे. (Pune Crime)

याबाबत माहिती अशी की, आरोपी नामदेव शिंदे आणि मृत गणेश गडकर हे मित्र असून नामदेव याच्या मोबाईल मध्ये गणेशचे फोटो, सेल्फीही पोलिसांना आढळून आले आहे.
आरोपी आणि मृत गणेश गडकर हे एकाच जिल्ह्यातील आहेत. गणेश याचा काटा काढण्याच्या उद्देशाने नामदेवने त्याला 27 जानेवारी रोजी रात्री 11 वाजता जनता गॅरेज जवळ बोलावून घेतले. त्याठिकाणी त्यांचे एकमेकांसोबत भांडण झाले. त्या चौघांनी मिळून गणेशला जमिनीवर पाडून त्याच्या डोक्यात दगड घालून डोके दगडाने ठेचून खून केला.

त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने गणेशचा मृतदेह तब्बल 40 फूट फरफटत नेऊन गॅरेजमधील 2 गाड्यांच्या मध्ये फेकून दिला आहे. भोसरी येथे 27 जानेवारी रोजी याबाबत घटना घडल्याचे समोर आले. नामदेव शिंदे याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्यानंतर त्याच्या 3 साथीदारांसोबत मिळून गणेश गडकर याची हत्या केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याच्या 3 साथीदारांनाही अटक (Arrested) केली आहे.


Web Title :-
Pune Crime | Youth of Latur stoned to death in Bhosari Pune To destroy the evidence the bodies were thrown into the garage causing a commotion in the area

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

Anti Corruption Bureau (ACB) Mumbai | अ‍ॅन्टी करप्शनने परमबीर सिंह यांची केली 2 तास चौकशी; पोलीस निरीक्षक अनुप डांगे प्रकरणात नोंदविला जबाब

Pune Crime | 10 वर्षाच्या मुलीला घरात बोलावून केला बलात्कार ; कोंढव्यातील धक्कादायक घटना

Aadhaar Update | ‘वन नेशन वन रजिस्ट्रेशन’ अंतर्गत आता जमीनीचा सुद्धा असेल ‘आधार’ नंबर, जाणून घ्या काय होतील फायदे

The post Pune Crime | पुण्याच्या भोसरीमध्ये लातूरच्या युवकाचा दगडाने ठेचून खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह गॅरेजमध्ये दिला फेकून, परिसरात खळबळ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article