Header

Pune Crime | ‘मटका किंग’च्या खून प्रकरणी पुण्यातील भाजपच्या ‘गोल्डन मॅन’ला अटक; प्रचंड खळबळ

Pune Crime | ‘मटका किंग’च्या खून प्रकरणी पुण्यातील भाजपच्या ‘गोल्डन मॅन’ला अटक; प्रचंड खळबळ

Pune Crime | BJP Office Bearers And Katraj Gold Man Amol Bandopant Hulavale arrested in Matka King Sanjay Patole Murder Case Shirval Satara Police Pune Crime News

पुणे/शिरवळ : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील मटका किंग संजय पाटोळे (Matka King Sanjay Patole) याच्या खून प्रकरणी पुण्यातील भाजप पदाधिकारी (BJP Office Bearers) व गोल्डन मॅनला (Gold Man) सातारा पोलिसांनी (Satara Police) अटक केली आहे (Pune Crime). अमोल बंडोपंत हुलावळे Amol Bandopant Hulavale (वय ३६, रा. कात्रज – Katraj) असे या गोल्डन मॅनचे नाव आहे. भारती विद्यापीठ परिसरात (Bharti Vidyapeeth Area) अमोल हुलावळे हा गोल्डन मॅन म्हणून ओळखला जातो.

अमोल हुलावळे याच्याविरोधात यापूर्वी फरासखाना (Faraskhana Police Station), हिंजवडी (Hinjewadi Police Station), दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. फरासखाना पोलिसांनी त्याला बेकायदेशीरपणे पिस्तुल बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. तसेच वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Pune Crime)

शंकरा फौंडेशनच्या माध्यमातून त्याने राजकीय, सामाजिक कामाला सुरुवात केली. अखिल भारतीय मराठा महासंघाचा युवक प्रदेश उपाध्यक्षपदी त्याची निवड करण्यात आली आहे. भाजपच्या माथाडी ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षा रक्षक जनरल कामगार युनियनचा पश्चिम महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष आहे.

मटका किंग संजय पाटोळे याच्या खून प्रकरणी शिरवळ पोलिसांनी (Shirval Police) यापूर्वी ६ जणांना अटक केली होती. पैशांच्या देवाण घेवाणीवरुन त्याचा खून करण्यात आला होता. तरबेज मेहमूद सुतार, किरण बबनराव साळुंखे, विकी राजेंद्र जाधव, शंकर ऊर्फ तात्या आश्रुबा पारवे, नितीश ऊर्फ रित्या सतीश पतंगे आणि राकेश् सुरेश गायकवाड अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत अमोल हुलावळे याचा हात असल्याचे समोर आल्यानंतर शिरवळ पोलिसांनी मंगळवारी त्याला पुण्यातून अटक केली. अमोल हुलावळे हा येणार्‍या महापालिका निवडणुक Pune Corporation Elections (PMC Elections) लढविण्याची तयारी करत होता. त्यादृष्टीने तो कात्रज परिसरात अनेक कार्यक्रमाचे आयोजन करु लागला होता.

Web Title :- Pune Crime | BJP Office Bearers And Katraj Gold Man Amol Bandopant Hulavale arrested in Matka King Sanjay Patole Murder Case Shirval Satara Police Pune Crime News

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

NCP Nawab Malik | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी; दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याच्या चौकशीनंतर ED ने उचलले पाऊल

Nandurbar Police | नवापुर पोलीस ठाण्यातील व्यायाम शाळेचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Nandurbar Police | नंदुरबार पोलीस दलातील नवापुर पोलीस ठाण्यातील महिला विश्राम गृहाचे उद्घाटन

The post Pune Crime | ‘मटका किंग’च्या खून प्रकरणी पुण्यातील भाजपच्या ‘गोल्डन मॅन’ला अटक; प्रचंड खळबळ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article