Header

Pune Crime | पुण्याच्या मार्केटयार्ड परिसरातील चाफळकर कॉलनीतील भल्या पहाटे थरार ! चोरट्यांकडून पोलिसांवर दगडफेक, पोलिसांचा स्वसंरक्षणार्थ गोळीबार

Pune Crime | पुण्याच्या मार्केटयार्ड परिसरातील चाफळकर कॉलनीतील भल्या पहाटे थरार ! चोरट्यांकडून पोलिसांवर दगडफेक, पोलिसांचा स्वसंरक्षणार्थ गोळीबार

Pune Crime | Firing Incident in Marketyard Stone Pelting By Thieves On Beat Marshall Pune Police Pune Satara Road Chafalkar Colony

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | घरफोडी करण्यासाठी आलेल्या ३ ते ४ चोरट्यांना पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर (Pune Police) चोरट्यांनी दगडफेक (Stone Pelting By Thieves) केल्याने पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार (Firing In Self Defence) करण्याची घटना घडली. पुणे – सातारा रोडवरील (Pune-Satara Road) चाफळकर कॉलनीत (Chafalkar Colony) पहाटे साडेचार वाजता घडली. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी सांगितले की, सातारा रोडवरील सिटी प्राईड (City Pride Satara Road) मागे चाफळकर कॉलनी आहे. या कॉलनीतील सानिया या अपार्टमेंटमध्ये (Saniya Apartment) चोरटे घरफोडी करण्यासाठी शिरले (Pune Criminals) होते. पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास तिसर्‍या मजल्यावर आवाज झाल्याने सुरक्षा रक्षकाला (Security Guard) जाग आली. त्याला चोरटे आल्याचा सुगावा लागल्याने त्याने पोलीस नियंत्रण कक्षाला (Pune Police Control Room) कळविले.

पहाटे गस्तीवर असलेले बीट मार्शल तातडीने तेथे दाखल (Pune Crime) झाले.
यावेळी चोरटे इमारतीतून बाहेर येत होते. पोलिसांना पाहून त्यांनी आपल्याकडील चाकू त्यांच्या दिशेने फेकून मारला. पाठोपाठ तेथील दगड उचलून ते पोलिसांना मारु लागले. हे पाहून बीट मार्शल (Beat Marshall Police) यांनी हवेत गोळीबार (Firing In Pune) केला. तेव्हा चोरटे शेजारील ओढ्यातून पळून गेले.

या घटनेची माहिती मिळाल्यावर आणखी पोलीस कुमक तेथे पाठविण्यात आली.
चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरु असून मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात (Marketyard Police Station) गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

Web Title :- Pune Crime | Firing Incident in Marketyard Stone Pelting By Thieves On Beat Marshall Pune Police Pune Satara Road Chafalkar Colony

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Multibagger Stocks | ‘या’ मल्टीबॅगर स्टॉकवर खेळू शकता डाव, पुढील 6 महिन्यात पोहचू शकतो 3,000 रुपयांच्या पुढे; एक्सपर्ट आहेत बुलिश

Pune Crime | ‘मटका किंग’च्या खून प्रकरणी पुण्यातील भाजपच्या ‘गोल्डन मॅन’ला अटक; प्रचंड खळबळ

NCP Nawab Malik | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी; दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याच्या चौकशीनंतर ED ने उचलले पाऊल

The post Pune Crime | पुण्याच्या मार्केटयार्ड परिसरातील चाफळकर कॉलनीतील भल्या पहाटे थरार ! चोरट्यांकडून पोलिसांवर दगडफेक, पोलिसांचा स्वसंरक्षणार्थ गोळीबार appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article