Header

Pune Police | पुण्यातील वजनदार पोलिस कर्मचार्‍याचं तडकाफडकी निलंबन ! अवैध धंद्येवाल्यांशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या संपर्कात असल्याचा ठपका

Pune Police | पुण्यातील वजनदार पोलिस कर्मचार्‍याचं तडकाफडकी निलंबन ! अवैध धंद्येवाल्यांशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या संपर्कात असल्याचा ठपका

Pune Police | DCP Sagar Patil Suspended Bharti Vidyapeeth Police Station's Raju Dhondiba Vegre For Relations with Illegal Traders

पुणे : बहुजननामा ऑनलाइन (नितीन पाटील) – Pune Police | पुणे शहरातील अवैध धंद्येवाल्यांशी (Illegal Traders) प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षरित्या संपर्कात राहून कर्तव्यात सचोटी, कर्तव्यपरायणता न राखल्यामुळे एका वजनदार पोलिस कर्मचार्‍याला तडकाफडकी निलंबीत (Suspended) करण्यात आलं आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) कार्यरत असलेल्या राजु धोंडीबा वेगरे (Raju Dhondiba Vegre) यांना पोलिस उपायुक्त सागर पाटील (DCP Sagar Patil) यांनी निलंबीत केले आहे. त्याबाबतचे आदेश त्यांनी बुधवारी रात्री उशिरा निर्गमित केले आहेत. (Pune Police)

अवैध धंद्यांना थारा दिला जाणार नाही. कोठेही अवैध धंद्ये सुरू राहणार नाहीत याबाबत पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) आणि सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr. Ravindra Shisve) यांनी यापुर्वीच स्पष्ट केलं आहे. तरी काही पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुलेआम अवैध धंद्ये सुरू आहेत असं निदर्शनास आल्यानंतर संबंधित पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यावर कारवई केली जात आहे. मात्र, वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना महिन्याकाठी मलिदा गोळा करणारे तसेच पोलिस ठाण्याचं महत्वाचं कामकाज बघणारे नामानिराळे रहात होते. मात्र, पोलीसनामा ऑनलाइननं (www.policenama.com) भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात वजनदार पोलिस कर्मचारी ‘राज वगैरे-वगैरे’ असा उल्लेख एका बातमीमध्ये केला होता. त्यानंतर अति वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी गोपीनियरित्या माहिती घेतली. (Pune Police)

त्यामध्ये भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील कर्मचारी राजु धोंडीबा वेगरे हे शहरातील अवैध धंद्येवाल्यांशी प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षरित्या संपर्कात असल्याचं निष्पन्न झालं. अति वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी संबंधिताची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिस उपायुक्त सागर पाटील यांनी राजु वेगरे यांना तडकाफडकी निलंबीत केले आहे.


Web Title :-
Pune Police | DCP Sagar Patil Suspended Bharti Vidyapeeth Police Station’s Raju Dhondiba Vegre For Relations with Illegal Traders

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Pune Police | पोलिस आयुक्त अमिताभ गुप्तांचा ‘रूद्रावतार’ ! आणखी एका वरिष्ठ पोलिस निरीक्षकास केलं कंट्रोलशी संलग्न; अनेकांचे धाबे दणाणले, ‘सेक्शन’ गरम

Russian President Vladimir Putin | रशियाने युक्रेनवर केला लष्करी हल्ला; पुतीन यांची युद्धाची घोषणा, चार शहरावर मिसाईल हल्ले

ED Arrest NCP Leader Nawab Malik In Money Laundering Case | ठाकरे सरकारमीधल मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांना ईडीकडून अटक; दाऊद इब्राहिम मनी लॉड्रींग केसशी कनेक्शन

The post Pune Police | पुण्यातील वजनदार पोलिस कर्मचार्‍याचं तडकाफडकी निलंबन ! अवैध धंद्येवाल्यांशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या संपर्कात असल्याचा ठपका appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article