Pune Crime | ‘कन्फाईनमेंट डिटेन्शन सेल’मध्ये 20 दिवस छळ केल्याप्रकरणी दोघा कर्नलसह 7 जणांवर गुन्हा दाखल; खडकीतील CSD मधील घटना, मिलटरी कॅन्टीनची दारु बाहेर विकल्याच्या आरोपातून केला होता छळ

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | रेंजहिल्स गोल मार्केट (Range Hills Gol Market) येथील लष्कराच्या कॅन्टीनमधून (Military Canteen) स्वस्तात दारु (Wine) घेऊन ती बाहेरच्या लोकांना विकत असल्याचा आरोप करुन एका जवानाला (Army Jawan) बेदम मारहाण करुन त्याला 20 दिवस कन्फाईनमेंट डिटेन्शन सेलमध्ये (Confinement Detention Cell) ठेवून जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खडकी पोलिसांनी (Khadki Police) 2 कर्नलसह (Colonel) 7 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)
कर्नल जितेंद्र सिंग, कर्नल सिद्धु, नायब सुभेदार सचिन, हवालदार श्रीनिवास, शिपाई कलमजित, नाईक राधेश्याम (रा. खडकी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मानव अजित घोष (वय ३४, रा. मिलटरी हॉस्पिटल, रेंजहिल्स, खडकी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) फिर्याद दिली आहे. ही घटना रेंजहिल्स गोल मार्केट येथे ६ जुलै २०२१ रोजी रात्री साडे आठ वाजता घडली होती. (Pune Crime)
लष्करातील अधिकारी, जवान यांना सर्व जीवनावश्यक साहित्य कमी किंमतीत लष्कराच्या कॅटिंगमधून दिले जाते. त्यात लिकर/दारु ही बाजारभावापेक्षा कमी किंमतीत मिलटरी कॅटिंगमध्ये मिळत असते. मानव घोष हे रेंजहिल्स गोल मार्केट येथे गेले असताना आरोपींनी त्यांना तेथून घेऊन गेला. सीएसडी लिकर कँटींगमधून बेकायदेशीररित्या बाहेरील व्यक्तीला विकत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला.
कर्नल जितेंद्र सिंग यांनी फिर्यादीला मारहाण केली. लोखंडी रॉडने फिर्यादीचे डाव्या पायाचा गुडघा व डाव्या हाताचे खांद्याला मारहाण करुन दुखापत केली. फिर्यादीचे नातेवाईकांना कोणतीही कल्पना न देता फिर्यादीस २० दिवस चौकशी करीता कन्फाईनमेंट डिटेन्शन सेल येथे ठेवले होते. फिर्यादीला मानसिक व शारीरीक त्रास देऊन वेगवेगळ्या मोबाईलवरुन जीवे मारण्याची वेळोवेळी धमकी देण्यात आली.
याप्रकरणाची लष्कराच्या वतीने कोर्ट ऑफ इन्क्वायरी झाली. त्यानंतर आता मानव घोष यांनी फिर्याद दिली असून खडकी पोलिसांनी दोघा कर्नलसह ७ जणांवर गुन्हा दाखल केला.
Web Title :- Pune Crime | 7 people including two colonels charged with 20 days of harassment in Confinement Detention Cell Incidents in the CSD in Khadki were persecuted for allegedly selling liquor out of a military canteen
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
The post Pune Crime | ‘कन्फाईनमेंट डिटेन्शन सेल’मध्ये 20 दिवस छळ केल्याप्रकरणी दोघा कर्नलसह 7 जणांवर गुन्हा दाखल; खडकीतील CSD मधील घटना, मिलटरी कॅन्टीनची दारु बाहेर विकल्याच्या आरोपातून केला होता छळ appeared first on बहुजननामा.