Header

Advocate Umeshchandra Yadav-Patil | कोल्हापूर जिल्ह्यातील 6 वर्षीय बालिकेच्या बलात्कार आणि खून प्रकरणात ॲड. यादव विशेष सरकारी वकील म्हणून सरकारकडुन नियुक्त

Advocate Umeshchandra Yadav-Patil | कोल्हापूर जिल्ह्यातील 6 वर्षीय बालिकेच्या बलात्कार आणि खून प्रकरणात ॲड. यादव विशेष सरकारी वकील म्हणून सरकारकडुन नियुक्त

Advocate Umeshchandra Yadav-Patil | Adv. Yadav appointed as Special Public Prosecutor in the case of rape and murder of 6 year old girl in Kolhapur district

कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाइन – Advocate Umeshchandra Yadav-Patil | खोची येथील सहा वर्षीय बालिकेच्या बलात्कार आणि खून (Rape And Murder Case In Kolhapur District) प्रकरणी शासनातर्फे विशेष सरकारी वकील (Special Public Prosecutor) म्हणून मुंबईतील ख्यातनाम फौजदारी वकील उमेशचंद्र यादव – पाटील (Advocate Umeshchandra Yadav-Patil) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या विधी व न्याय विभागाने हा आदेश जारी केला आहे.

31 ऑक्टोबर, २०२१ रोजी मु. पो. खोची, तालुका हातकणंगले येथील राहत्या घरातून सहा वर्षीय बालिकेचे भरदिवसा अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर, त्याचदिवशी तिच्यावर जबरी बलात्कार झालेला मृतदेह आढळून आला होता. सदर बालिकेचे प्रथम अपहरण करून नंतर तिच्यावर अतिशय क्रूरपणे बलात्कार करून खून केल्याचे स्पष्ट झाले होते.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया (Kolhapur IG Manoj Lohiya), जिल्हा पोलिस प्रमुख डॉ शैलेश बलकवडे (SP Shailesh Balkawade), अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे (Addl SP Tirupati Kakde) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास स्थानिक गुन्हा शाखेकडे (Local Crime Branch, Kolhapur) वर्ग करण्यात आला होता.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी व स्थानिक पोलीस यांनी अल्पावधीतच गुन्हेगारांला काही तासातच जेरबंद केले. या प्रकरणात बंडा उर्फ प्रदीप पोवार (Banda alias Pradeep Powar) हा गावातील आणि पीडित मुलीच्या शेजारील रहिवासीच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

आरोपी बंडा उर्फ प्रदीप पोवार याने मयत कुटुंबाशी असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेत पीडित बालिकेचे प्रथम अपहरण करून तिला गावातील एका धार्मिक स्थळाच्या शेजारी नेऊन तिच्यावर पाशवी अत्याचार केला. त्यानंतर, सदर प्रकरणाची वाच्यता होऊ नये म्हणून सदर बालिकेचा गळा दाबून अत्यंत निर्घृणपणे खून केला. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गृह खात्याने ॲड. उमेशचंद्र यादव – पाटील (Advocate Umeshchandra Yadav-Patil) यांच्या नियुक्तीचा आदेश दि 17 मार्च, 2022 जारी केला आहे. ॲड. यादव – पाटील यांच्या नियुक्तीमुळे आरोपीला कठोरात कठोर शासन होईल असा आशावाद खोची ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

Web Title :- Advocate Umeshchandra Yadav-Patil | Adv. Yadav appointed as Special Public Prosecutor in the case of rape and murder of 6 year old girl in Kolhapur district

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Pune Crime | हप्त्याची मागणी करुन टोळक्याचा कोंढव्यातील VIT होस्टेल चौकात ‘राडा’, पोलिसांकडून भाईगिरी करणार्‍या तिघांना अटक

Pravin Darekar | प्रवीण दरेकरांना सत्र न्यायालयाचा मोठा दिलासा ! कोर्टानं मुंबई पोलिसांना दिले ‘हे’ निर्देश

Uric Acid | यूरिक अ‍ॅसिड वाढल्याने टाचेत होऊ शकतात वेदना, जाणून घ्या समस्या वाढण्याचे कारण आणि उपचार

The post Advocate Umeshchandra Yadav-Patil | कोल्हापूर जिल्ह्यातील 6 वर्षीय बालिकेच्या बलात्कार आणि खून प्रकरणात ॲड. यादव विशेष सरकारी वकील म्हणून सरकारकडुन नियुक्त appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article