Header

Pune Crime | हप्त्याची मागणी करुन टोळक्याचा कोंढव्यातील VIT होस्टेल चौकात ‘राडा’, पोलिसांकडून भाईगिरी करणार्‍या तिघांना अटक

Pune Crime | हप्त्याची मागणी करुन टोळक्याचा कोंढव्यातील VIT होस्टेल चौकात ‘राडा’, पोलिसांकडून भाईगिरी करणार्‍या तिघांना अटक

Pune Crime Kondhwa Police Station VIT Hostel Road Chowk Kondhwa Budruk Pune Crime News

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | हप्ता देण्यास नकार दिल्याने कोंढव्यातील व्ही आय टी होस्टेल (VIT Hostel Rd, Kondhwa Budruk) चौकातील स्टॉलमधील साहित्याची तोडफोड करुन एका टोळक्याने कोंढव्यात (Kondhwa) धुडगुस घातला. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) भाईगिरी करणार्‍या तिघांना अटक केली आहे. (Pune Crime)

यासीन बाशा मुल्ला (वय २५), मेहबुब बाशा मुल्ला (वय ३०) आणि लालअप्पा कोळी (वय २७) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी  संतोष सौदागर मोरे (रा. शिक्षक सोसायटी, गोकुळनगर, कात्रज कोंढवा रोड) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. संतोष मोरे यांचे कात्रज कोंढवा रोडवरील व्हीआयटी होस्टेल चौकात पान टपरी आणि एस कुमार वडेवाले हा स्टॉल आहे. आरोपी व त्यांचा एक मित्र हे बुधवारी रात्री पावणे नऊ वाजता त्यांच्याकडे आले. आम्ही इथले भाई असून आम्हाला दरमहा हप्ता द्यायला लागेल, असे म्हणून पैशांची मागणी करु लागले.

तेव्हा मोरे यांनी पैसे देण्यास नकार दिला (Pune Crime). त्यावर आरोपींनी मोरे व त्यांचा मेव्हणा विशाल पवार यांना हाताने मारहाण केली. मोरे यांच्या पाठीवर व पवार यांच्या मानेवर हातातील रॉडने, खुर्च्यांनी मारहाण केली. दोघांच्या हाताचे चावे घेतले. हॉटेलची तोडफोड करुन हॉटेलच्या काऊंटरमधून ८ हजार रुपये तसेच मोरे यांच्या गळ्यातील १ लाख ५ हजार रुपयांची ३० ग्रॅम वजनाची सोनसाखळी जबरदस्ती हिसकावून चोरुन नेली. पोलिसांनी तिघांना अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक गपाट तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Kondhwa Police Station VIT Hostel Road Chowk Kondhwa Budruk Pune Crime News

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Uric Acid | यूरिक अ‍ॅसिड वाढल्याने टाचेत होऊ शकतात वेदना, जाणून घ्या समस्या वाढण्याचे कारण आणि उपचार

Thigh Fat Exercises | मांड्यांची चरबी कमी करण्यासह त्यांना आकारात आणण्यासाठी उत्तम आहेत ‘हे’ 3 व्यायाम; जाणून घ्या

Hot Water Bag Side Effects | झोपताना सुद्धा करत असाल गरम पाण्याच्या पिशवीचा वापर, तर व्हा सावध !

The post Pune Crime | हप्त्याची मागणी करुन टोळक्याचा कोंढव्यातील VIT होस्टेल चौकात ‘राडा’, पोलिसांकडून भाईगिरी करणार्‍या तिघांना अटक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article