Header

Amruta Fadnavis | रंगपंचमीचे फोटो शेअर करत अमृता फडणवीसांनी केली ‘नॉटी’ कमेंट, दिल्या शुभेच्छा

Amruta Fadnavis | रंगपंचमीचे फोटो शेअर करत अमृता फडणवीसांनी केली ‘नॉटी’ कमेंट, दिल्या शुभेच्छा

Amruta Fadnavis | naughty comment by amruta fadnavis sharing photos of rangpachami

बहुजननामा ऑनलाइन टीम – Amruta Fadnavis | गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे सावट असल्याने सणांवर निर्बंध होते. मात्र यावर्षी पुन्हा तोच जोश सण साजरा करताना पाहायला मिळाला. मोठ्या उत्साहात धुळवडीचा सण राज्यभर साजरा करण्यात आला. होळी आणि धुळवडीचा सण साजरा करताना नागरिकांचा उत्साह शिगेला पोहोचला होताच पण नेतेमंडळीही यामध्ये मागे नव्हती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनीही धुलीवंदन साजरे केल्याचे फोटो शेअर केले. हे फोटो शेअर करताना त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधत एक ‘नॉटी’ कमेंटही केली आहे.

नॉटी कमेंट करून पहिल्यांदाच अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला नाही तर यापूर्वीही त्यांनी राऊत यांना लक्ष्य केले होते. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी होळी, रंगपंचमीनिमित्त सणानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्याचं पण यावेळी त्यांनी शिवसेनेला चिमटा ही काढला.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात चांगलाच वाद रंगला होता. संजय राऊत यांनी कंगणाबद्दल अर्वाच्च शब्दाचा वापर केल्यानं त्यांच्यावर चौफेर टीका होत होती. राऊत यांनी कंगनावर टीका करताना हरामखोर शब्दाचा वापर केला होता. त्यानंतर एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टीकरण देताना राऊत म्हणाले की, माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला असून कंगना थोडी नॉटी आहे. ती साधारणपणे असेच बोलत असते. तिची वक्तव्ये मी पाहिली असून मला माझ्या भाषेत तिला बेईमान म्हणायचे होते. असे म्हणण्यासाठी आम्ही हरामखोर शब्दाचा वापर करतो असं त्यांनी सांगितलं होतं

दरम्यान, अमृता फडणवीस यांनी संजय राऊतांच्या या विधानावरून त्यांना नॉटी शब्दावरुन लक्ष्य केलं होतं. अमृता फडणवीस यांनी नॉटी ट्विट महाविकास आघाडीला डिवचले होते. थोडक्यात उत्तर द्या, ५० मार्क्स; Naughty नामर्द, बिगड़े नवाब, नन्हें पटोले….. या जमाती एकत्रित कोठे पाहिल्या जाऊ शकतात ? रिक्त स्थानो की पूर्ति करो …५० मार्क्स ! __शराब नही होती ! हरामख़ोर का मतलब __है और सुनने में आया है ___नामर्द है !” असं ट्वीट त्यांनी केलं होतं.

आता पुन्हा एकदा फडणवीस यांनी होळी आणि रंगपंचमीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देताना अमृता यांनी नॉटी शब्दाचा वापर केला आहे. सर्व प्रियजनांना आणि नॉटी जनांनाही होळी, रंगपंचमीच्या हार्दीक शुभेच्छा… असे ट्विट त्यांनी केले आहे. या ट्विट वरून अमृता यांनी संजय राऊत यांच्यावरच निशाणा साधल्याचे दिसत आहे.

Web Title :- Amruta Fadnavis | naughty comment by amruta fadnavis sharing photos of rangpachami

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Pune Crime | धक्कादायक ! 11 वर्षाच्या मुलीवर वडिल, भाऊ आणि आजोबा, चुलत मामाने केले लैंगिक अत्याचार; समुपदेशक महिला ‘गुड टच अ‍ॅन्ड बॅड टच’ शिकवताना पिडीतीने सांगितली ‘आपबिती’

Reduce Risk Of Heart Attack | ब्लड प्रेशर आणि हार्ट अटॅकचा धोका कमी करतील ‘ही’ 5 फळे, उन्हाळ्यात डाएटमध्ये करा समावेश

Sharad Pawar | शिक्षकांच्या जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात शरद पवारांचे महत्त्वाचं विधान, म्हणाले…

The post Amruta Fadnavis | रंगपंचमीचे फोटो शेअर करत अमृता फडणवीसांनी केली ‘नॉटी’ कमेंट, दिल्या शुभेच्छा appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article