Header

Blood Sugar करायची असेल नियंत्रित तर सुरू करा ‘ही’ 5 कामे, जाणून घ्या कोणती

Blood Sugar करायची असेल नियंत्रित तर सुरू करा ‘ही’ 5 कामे, जाणून घ्या कोणती

Blood Sugar | if you want to control blood sugar then start these 5 things

बहुजननामा ऑनलाइन टीम – Blood Sugar | मधुमेह (Diabetes) हा खाण्याच्या चुकीच्या सवयी (Wrong Eating Habits) आणि बिघडलेल्या जीवनशैलीचा (Bad Lifestyle) परिणाम आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे हा आजार तरुणांनाही होत आहे. भारतात कोरोना महामारीनंतर (Corona Epidemic) या आजाराने ग्रस्त लोकांची संख्या वाढली आहे. देशात मधुमेह वेगाने पसरत आहे, या रुग्णांची संख्या 5 कोटींवर पोहोचली आहे (Blood Sugar).

जागतिक आरोग्य संघटनेनुसार 2030 पर्यंत देशात आणि जगात मधुमेहाच्या रुग्णांची (Diabetes Patients) संख्या 80 कोटीपर्यंत पोहोचू शकते. आहार (Diet) आणि जीवनशैलीची (Lifestyle) काळजी घेतली नाही तर मधुमेहामुळे उच्च रक्तदाब, हृदय, किडनीचे आजार, स्ट्रोक, डोळ्यांच्या समस्या, फुट अल्सर (High Blood Pressure, Heart, Kidney Disease, Stroke, Eye problems, Foot Ulcer) अशा अनेक आजारांचा धोका वाढू शकतो.

मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी जेवढे आहार आणि व्यायामावर (Exercise) नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, तेवढीच काही खास गोष्टींची काळजी घेणेही गरजेचे आहे. ब्लड शुगरचे (Blood Sugar) व्यवस्थापन कसे करावे, ते समजून घेवूयात.

ब्लड शुगरचे प्रमाण समजून घ्या (Understand Blood Sugar Level) :
जेव्हा आपण काही खातो किंवा पितो तेव्हा त्यात कार्बोहायड्रेट्स (Carbohydrates) असतात. हे कार्बोहायड्रेट म्हणजे साखर. काहीही खाल्ल्यानंतर किंवा प्यायल्यानंतर ते पोटात जाते, ते पोटात पचते आणि ग्लुकोज (Glucose) तयार होते. हे ग्लुकोज रक्तात वाहत राहते. ग्लुकोजशिवाय आपण काहीही करू शकत नाही, परंतु जेव्हा रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढते, म्हणजेच साखरेचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त होते, तेव्हा समस्या निर्माण होतात.

इन्सुलिनची भूमिका काय आहे : सर्वप्रथम, ब्लड शुगर का वाढते हे समजून घेणे आवश्यक आहे. जेव्हा रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढते तेव्हा पॅनक्रियाज (Pancreas) ग्रंथीमधून इन्सुलिन हार्मोन सोडले जाते. हे इन्सुलिन पेशींपर्यंत ग्लुकोजचे प्रमाण पोहोचवण्यास मदत करते. जेव्हा ग्लुकोज पेशींपर्यंत पोहोचते तेव्हा ते शरीरात ऊर्जा (Energy) निर्माण करण्यासाठी वापरले जाते.

टाईप 2 मधुमेहामध्ये (Type 2 Diabetes), पेशींपर्यंत पोहोचण्याऐवजी, ग्लुकोज रक्तामध्ये जमा होऊ लागते, म्हणजेच अनेक घटक पॅनक्रियाज इन्सुलिन बनण्यास प्रतिबंध करतात. या स्थितीत पॅनक्रियाजची इन्सुलिन तयार करण्याची क्षमता कमी होते.

असे करा मॅनेज (Manage Like This)
ब्लड शुगर मॅनेज करण्यासाठी, सर्वप्रथम, ब्लड शुगरचे योग्य प्रमाण जाणून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी रक्त तपासणी केली जाते. जर उपवासाच्या वेळी रक्तातील साखरेचे प्रमाण 100 मिलीग्राम प्रति डेसीलिटरपेक्षा कमी असेल तर मधुमेहाचा धोका नाही. जर ते 100 ते 125 च्या दरम्यान असेल तर ते मधुमेहाचे प्रारंभिक लक्षण असू शकते. जर ते 126 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला टाइप 2 मधुमेह आहे.

आता काय करावे (What To Do Now) – रक्त तपासणीनंतर तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्ही त्यावर सहज नियंत्रण ठेवू शकता.

सर्व प्रथम सिगारेट (Cigarette), दारू (Alcohol) सोडून द्या. कोणत्याही स्वरूपात तंबाखूचे सेवन करू नका. यामुळे मधुमेह तर वाढेलच पण कर्करोग (Cancer), हृदय, फुफ्फुसाचे आजारही (Lung Disease) होऊ शकतात.

वजनावर नियंत्रण ठेवा. वजन वाढणे हे अनेक आजारांचे मूळ आहे. वजन कमी करून तुम्ही मधुमेहाची तीव्रता कमी करू शकता.

व्यायाम खूप महत्वाचा आहे, जितका जास्त व्यायाम कराल तितका मधुमेहाचा धोका कमी होईल.

आहाराबाबत दक्षता सर्वात महत्त्वाची आहे. साखरेचे प्रमाण वाढेल असे काहीही खाऊ नका. सर्वप्रथम फॅटी, तेलकट, तळलेले, साखर, मीठ, मांस, हाय प्रोटीनयुक्त (Fatty, Oily, Fried, Sugar, Salt, Meat, High protein Food)
अन्न इत्यादी सोडून द्या. काय खाऊ नये याची डॉक्टरांकडून यादी करून घ्या.

आहारात स्मार्ट गोष्टींचा समावेश करा. आहारात हिरव्या भाज्या, फळे, संपूर्ण धान्य, सोयाबीन, शेंगा, मसूर, बदाम, अक्रोड, मासे (Green Vegetables, Fruits, Whole Grains, Soy beans, Legumes, Lentils, Almonds, Walnuts, Fish) इत्यादींचे सेवन केल्यास मधुमेहाचा धोकादायक धोका टाळू शकता.

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Web Title :- Blood Sugar | if you want to control blood sugar then start these 5 things

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Petrol Diesel Price Hike Pune | सलग पाचव्या दिवशी पेट्रोल, डिझेलची घोडदौड सुरुच; जाणून घ्या नवे दर

Gold Silver Price Today | सोने-चांदीच्या दरवाढीला अखेर ‘ब्रेक’, जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

Pune Hadapsar Fire | हडपसर येथील गाडीतळावरील 6 दुकाने आगीत भस्मसात (VIDEO)

The post Blood Sugar करायची असेल नियंत्रित तर सुरू करा ‘ही’ 5 कामे, जाणून घ्या कोणती appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article