Header

Petrol Diesel Prices Increased In Pune | पेट्रोल, डिझेलच्या दरात पुन्हा दरवाढ; मागील वेळेपेक्षा तिप्पट वेगाने वाढताहेत किंमती

Petrol Diesel Prices Increased In Pune | पेट्रोल, डिझेलच्या दरात पुन्हा दरवाढ; मागील वेळेपेक्षा तिप्पट वेगाने वाढताहेत किंमती

Petrol Diesel Prices Increased In Pune | Petrol Diesel Fuel Prices Increased In Pune For Third Time In Four Days

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Petrol Diesel Prices Increased In Pune | निवडणुका संपल्यानंतर ज्या पेट्रोल, डिझेलच्या किंमतीमध्ये दरवाढ होणार असल्याची भाकिते केली जात होती ती खरी झाली असून गेल्या चार दिवसात तिसर्‍यांदा पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. पाच राज्यातील निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वी पेट्रोल व डिझेलच्या दरात लिटरमागे साधारण २५ ते ३५ पैशांनी वाढ होत असे. आता मात्र, ८० ते ९० पैशांनी वाढ होत आहे.

तेल कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोलच्या किंमतीत प्रति लिटर ८१ पैशांनी वाढ केली. त्यामुळे पुण्यातील पेट्रोलचा दर ११२ रुपये लिटर झाला आहे. पॉवर पेट्रोलच्या दरात लिटरमागे ८३ पैशांनी वाढ झाली आहे. पॉवर पेट्रोलचा दर आता ११६.५२ रुपये लिटर झाला आहे.

पेट्रोलच्या पाठोपाठ डिझेलच्या दरातही लिटरमागे ८३ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. डिझेलचा दर ९४. ८० रुपये लिटर झाला आहे. जागतिक बाजारपेठेत क्रूड ऑईलच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याने पेट्रोल व डिझेलच्या किंमती २५ रुपयांपर्यंत वाढवाव्या लागतील, असे सांगितले जात होते. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलमधील दररोज होणारी वाढ अजून किमान महिनाभर तरी सुरु राहण्याचा अंदाज आहे. त्यादृष्टीने नागरिकांना आता खिशाची आणि मनाची तयारी करावी लागणार आहे.

Web Title :- Petrol Diesel Prices Increased In Pune | Petrol Diesel Fuel Prices Increased In Pune For Third Time In Four Days

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीचे दर पुन्हा वधारले; जाणून घ्या नवीन दर

Pune Crime | कोथरूडमध्ये 13 वर्षाच्या विशेष मुलाचा खून; खूनाचे गूढ अद्याप गुलदस्त्यात, एकाला अटक

Pune Crime | शिवाजीनगर परिसरातील शाळेत घुसून 11 वर्षाच्या मुलीवर बाथरूममध्ये बलात्कार करणारा नराधम अटकेत

The post Petrol Diesel Prices Increased In Pune | पेट्रोल, डिझेलच्या दरात पुन्हा दरवाढ; मागील वेळेपेक्षा तिप्पट वेगाने वाढताहेत किंमती appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article