Header

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीचे दर पुन्हा वधारले; जाणून घ्या नवीन दर

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीचे दर पुन्हा वधारले; जाणून घ्या नवीन दर

Gold Silver Price Today | gold silver rates rise once again find out today price 25 march 2022

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत (Gold Silver Price Today) सतत चढउतार होताना दिसत आहे. दिवसेंदिवस सोन्या – चांदीचे दर बदलत असतात. काल (गुरुवारी) सोन्या – चांदीच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. यानंतर पुन्हा सोन्या – चांदीच्या किमतीत वाढ दिसून आली. आज (शुक्रवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price) 47,950 रुपये आहे. तर चांदीची किंमत (Silver Price) 68,500 रुपये पर्यंत ट्रेड करत आहे.

भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत वाढ झाल्याचं दिसून येत आहे. गेल्या महिन्यात सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याने ग्राहकांची बाजारात गर्दी दिसून येत होती. तरी देखील सध्या सोनं 50 हजाराच्या आत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी योग्य संधी आहे.

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

आजचा सोन्याचा भाव –
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 48,050 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,350 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 48,020 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,330 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,950 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,310 रुपये

आजचा चांदीचा दर – 68,500 रुपये (प्रति किलो)

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rates rise once again find out today price 25 march 2022

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Rupali Chakankar | रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा (व्हिडीओ)

Sugar Level Control Tips | मधुमेहाच्या समस्येमध्ये ‘या’ आहेत फायदेशीर वनस्पती; वाढलेली शुगर झटपट कमी करतील, जाणून घ्या

Pune Crime | पुण्यात डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय गर्भपाताच्या गोळ्या विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; दोघा मेडिकल दुकानदारांना अटक

The post Gold Silver Price Today | सोन्या-चांदीचे दर पुन्हा वधारले; जाणून घ्या नवीन दर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article