Header

PUC Certificate | पीयूसी चाचणीकडे दुर्लक्ष केल्यास होईल 2 हजारांचा दंड; जाणून घ्या नियम

PUC Certificate | पीयूसी चाचणीकडे दुर्लक्ष केल्यास होईल 2 हजारांचा दंड; जाणून घ्या नियम

PUC Certificate | puc is ignored will fine 2 thousand rupees two wheeler and car pune news

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – PUC Certificate | वाहनामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही, याची हमी देणारे प्रमाणपत्र म्हणजेच पीयूसी प्रमाणपत्र (PUC Certificate) होय. ते विशेष तपासणी केंद्रांवर बनवले जाते. यामध्ये वाहनांमधून निघणाऱ्या कार्बन मोनॉक्साईड आणि कार्बन डायऑक्साइड यांसारख्या वेगवेगळ्या वायूंची चाचणी (Test) केली जाते. दरम्यान या PUC बाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

वाहन नवीन असेल तर 2 वर्षांनंतर व त्याहून जास्त कालावधी असलेल्या वाहनांची दर 6 महिन्यांनी पीयूसी चाचणी (PUC Test) होणे आवश्यक असते. परंतु,अनेक वाहनधारक आपल्या दुचाकी आणि चारचाकीच्या पीयूसी चाचणीकडे लक्ष देत नाहीत. मात्र असं करणं चांगलंच महागात पडणार आहे. पुण्यातील (Pune News) 1568 वाहनधारकांकडून जवळपास 8 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. म्हणून तुम्ही आपल्या गाडीची पीयुसी चाचणी केली नसेल तर करुन घेणे गरजेचे आहे. (PUC Certificate)

पीयुसी चाचणी केली नसल्यास 35 रुपयाची पीयूसी चाचणी आपणांस 2 हजार रुपयांना पडेल. दरम्यान, 1 जानेवारी ते 27 मार्चदरम्यान 1568 वाहनांवर कारवाई केली आहे. गतवर्षी साधारण 6 हजार वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. यामधून साधारण 13 लाख रुपयांचा दंड वसूल देखील केला आहे.

दरम्यान, वाहनासंदर्भात कारवाई करण्याचे अधिकार आरटीओ (RTO) आणि वाहतूक पोलिसांना (Pune Traffic Police) आहे. वाहने जप्त केल्यानंतर किंवा कारवाईच्या वेळी पीयूसी कागदपत्राची मागणी केली जाते. त्यावेळी जर कागदपत्रे नसेल तर किंवा चाचणी केलीच नसेल तर संबंधित वाहनांवर 2 हजार रुपयांचा दंड केला जातो.

35 रुपये पीयूसी चाचणी –
प्रति सहा महिन्यांनी दुचाकीची (Two-Wheeler) पीयूसी चाचणी केली पाहिजे. याची फी 35 रुपये आहे. मात्र जर चाचणी केली नसेल किंवा 6 महिन्यापेक्षा अधिक कालावधी समाप्त झाल्यास तर 2 हजार रुपयांचा दंड होऊ शकतो.
दरम्यान, फोरव्हिलर गाडीची फी 90 व 110 इतकी असते.

Web Title :- PUC Certificate | puc is ignored will fine 2 thousand rupees two wheeler and car pune news

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Pune Crime | पुण्यात 21 वर्षीय बॅक स्टेज आर्टिस्टवर दिग्दर्शकाचा बलात्कार; अश्लिल व्हिडिओ बनवून व्हायरल करण्याची धमकी

Petrol Diesel Price Hike Pune | पेट्रोल, डिझेलच्या दरातील भाववाढ अतिवेगवान; सलग सातव्या दिवशी दरवाढ

Thackeray Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! आता कारागृहातील कैद्यांना मिळणार कर्ज; देशातील पहिलीच योजना

The post PUC Certificate | पीयूसी चाचणीकडे दुर्लक्ष केल्यास होईल 2 हजारांचा दंड; जाणून घ्या नियम appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article