Header

Pune Crime | पुण्यात 21 वर्षीय बॅक स्टेज आर्टिस्टवर दिग्दर्शकाचा बलात्कार; अश्लिल व्हिडिओ बनवून व्हायरल करण्याची धमकी

Pune Crime | पुण्यात 21 वर्षीय बॅक स्टेज आर्टिस्टवर दिग्दर्शकाचा बलात्कार; अश्लिल व्हिडिओ बनवून व्हायरल करण्याची धमकी

Pune Crime | 21 year old backstage artist raped by director in Pune Threatening to go viral by making pornographic videos

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | फिल्म इंडस्ट्रीत (Indian Film Industry) बरोबर काम करणार्‍या तरुणीला मित्राच्या फ्लॅटवर पार्टी करण्यासाठी घेऊन जाऊन तेथे तिच्यावर बलात्कार (Rape In Pune) केला. त्यानंतर अश्लिल व्हिडिओ (Pornographic Videos) बवून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने वारंवार या तरुणीशी जबरदस्तीने शारीरीक संबंध (Physical Relation) केल्याचा धक्कादायक प्रकार (Pune Crime) समोर आला आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी (Vishrantwadi Police) अमित प्रेमचंद सिटलानी Amit Premchand Sitlani (वय ४०, रा. मधुबन सोसायटी, कळस) याच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

याप्रकरणी कात्रज कोंढवा रोडवर (Katraj Kondhwa Road) राहणार्‍या एका २१ वर्षाच्या तरुणीने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार मे २०१७ पासून २६ मार्च २०२२ पर्यंत सुरु होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये बॅक स्टेज ज्युनिअर आर्टिस्ट (Backstage Junior Artist) म्हणून काम करते. अमित सिटलानी हाही कास्टिंग दिग्दर्शक (Casting Director) म्हणून काम करतो. एका मित्राच्या ओळखीतून त्यांची ओळख झाली होती. अमित सिटलानी याने फिर्यादी यांना मे २०१७ मध्ये टिंगरेनगर (Tingrenagar) येथील मित्राच्या फ्लॅटवर पार्टी करण्यासाठी नेले. तेथे त्याने फिर्यादीला (Pune Crime) बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांच्यावर बलात्कार केला. त्याने याचा अश्लिल व्हिडिओ बनवला होता.

त्यानंतर २०१८ पासून त्याने हा अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन फिर्यादी यांना तो वेगवेगळ्या हॉटेलवर बोलवायचा. इस्ट फिल हॉटेल, विमाननगर व स्काय व्हिस्टा हॉटेल, खराडी (Kharadi) येथे घेऊन जाऊन फिर्यादी यांच्याशी त्याने जबरदस्तीने शारीरीक संबंध केले. यावेळी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली.

२६ मार्च २०२२ रोजी त्याने हॉटेलवर बोलावून फिर्यादी यांच्यावर बलात्कार केला. वारंवार होत असलेल्या या अत्याचाराला कंटाळून शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे. विश्रांतवाडी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मगदुम (PSI Shubhangi Magdum) अधिक तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | 21 year old backstage artist raped by director in Pune Threatening to go viral by making pornographic videos

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Petrol Diesel Price Hike Pune | पेट्रोल, डिझेलच्या दरातील भाववाढ अतिवेगवान; सलग सातव्या दिवशी दरवाढ

Thackeray Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! आता कारागृहातील कैद्यांना मिळणार कर्ज; देशातील पहिलीच योजना

Pune Crime | लोणावळ्यात 4 कोटींची रोकड जप्त, दोघांना अटक

The post Pune Crime | पुण्यात 21 वर्षीय बॅक स्टेज आर्टिस्टवर दिग्दर्शकाचा बलात्कार; अश्लिल व्हिडिओ बनवून व्हायरल करण्याची धमकी appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article