Header

Pune Crime | कोथरूडमध्ये 13 वर्षाच्या विशेष मुलाचा खून; खूनाचे गूढ अद्याप गुलदस्त्यात, एकाला अटक

Pune Crime | कोथरूडमध्ये 13 वर्षाच्या विशेष मुलाचा खून; खूनाचे गूढ अद्याप गुलदस्त्यात, एकाला अटक

Pune Crime | 13-Year-Old Boy Found Murdered, Body Found In Gunny Sack Near Eklavya Polytechnic Kothrud Pune Ground

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime |कोथरुडमधील एकलव्य पॉलिटेक्निक कॉलेज मैदानाजवळ (Eklavya Shikshan Sanstha Polytechnic Pune) एका १३ वर्षीच्या मुलाचा खून (Murder In Kothrud, Pune) करून मृतदेह पोत्यात (Dead Body In Gunny Sack) बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी रात्री उशिरा उघडकीस आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (Pune Crime)

करण गोपाळ राठोड Karan Gopal Rathod (वय १३, रा. म्हातोबानगर, कोथरुड) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी (Kothrud Police) एकाला अटक केली आहे. पिंटू गौतम Pintu Gautam (वय २६, रा. म्हतोबानगर, कोथरुड, मुळ रा. उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्याचे नाव आहे. गौतम हा या परिसरात पिठाची गिरणी चालवितो. त्याने करण याचा खून का केला, याविषयी मात्र अद्याप तो काही बोलत नाही.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एकलव्य कॉलेज मैदानाजवळ रात्रीच्या वेळेस लहान मुले खेळत होती. त्यांना पोत्यात काहीतरी बांधून ठेवलेले आढळून आले. पोते उघडून पाहिल्यावर त्यात मृतदेह आढळून आला. त्यांनी आसपासच्या लोकांना सांगितले. तेथून ती बातमी पोलिसांना मिळाली. मृत मुलगा विशेष असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याचे आई वडील मजुरी करतात. मुलाच्या अंगावर एकही कपडा नव्हता. त्यामुळे अनेक शंकाकुशंका (Pune Crime) व्यक्त केल्या जात आहे. पोलिसांनी संशयिताला पकडले असले तरी खूनामागचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

Web Title :- Pune Crime | 13-Year-Old Boy Found Murdered, Body Found In Gunny Sack Near Eklavya Polytechnic Kothrud Pune Ground

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Ayurveda For Good Sleep | रात्री झोप पूर्ण होत नाही का? मग ‘या’ 6 आयुर्वेदिक टिप्सची घ्या मदत

Gold Silver Price Today | सोन्या चांदीचे दर पुन्हा वधारले; जाणून घ्या आजचे दर

Pune Crime | धक्कादायक ! शिवाजीनगर परिसरातील शाळेत भरदिवसा घुसून 11 वर्षाच्या मुलीवर बाथरुममध्ये बलात्कार

The post Pune Crime | कोथरूडमध्ये 13 वर्षाच्या विशेष मुलाचा खून; खूनाचे गूढ अद्याप गुलदस्त्यात, एकाला अटक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article