Header

Pune Crime | धक्कादायक ! शेजार्‍यानेच 15 वर्षाच्या मुलीवर केला बलात्कार; सिंहगड रोड पो. स्टेच्या नर्‍हे परिसरातील घटना

Pune Crime | धक्कादायक ! शेजार्‍यानेच 15 वर्षाच्या मुलीवर केला बलात्कार; सिंहगड रोड पो. स्टेच्या नर्‍हे परिसरातील घटना

Pune Crime | Shocking 15 year old girl raped by neighbor Incident in Narhe area of Sinhagad Road Police Station limits

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | ताडीवाला रोड (Tadiwala Road, Pune) येथील एका 11 वर्षाच्या मुलीवर वडील, भाऊ, चुलत मामा यांनीच बलात्कार (Rape In Pune) केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला असताना आता नर्‍हे (Narhe) येथे एका 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर (Minor Girl) शेजारी राहणार्‍यानेच बलात्कार (Pune Crime) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road Police) एका 30 वर्षाच्या नराधमास अटक (Arrest) केली आहे.

याबाबत पोलिसांनी (Pune Police) दिलेल्या माहितीनुसार, नर्‍हे परिसरात ही 15 वर्षाची मुलगी आई वडिलांसमवेत राहते. नववीत शिकणार्‍या या मुलीला वडिलांनी ऑनलाईन क्लाससाठी (Online Classes In Pune) मोबाईल दिला होता. आरोपी हा त्यांच्या शेजारी (Neighbors) रहायला आहे. ती त्याला काका म्हणते. आरोपीने तिला मोबाईलवरुन संपर्क ठेवण्यास सुरुवात केली. त्याने या मुलीशी लगड करुन तिला विश्वासात घेतले.

तिचे आईवडिल बाहेर गेले की शेजारी राहणारा हा नराधम जबरदस्तीने तिच्या घरी जायचा. सप्टेंबर २०२१ मध्ये त्याने तिच्यावर जबरदस्ती करुन लैंगिक अत्याचार (Sexual Harassment) केला. तिला मोबाईलवर मेसेज करुन तो हा प्रकार कोणाला सांगू नको, नाही तर तुझ्या आई वडिल व भावाला ठार मारुन टाकेन, अशी धमकी देत होता. या नराधमाचा त्रास असाह्य झाल्याने दोन दिवसांपूर्वी तिने हे सर्व आपल्या आई वडिलांना सांगितले. (Pune Crime)

पीडित मुलीने सांगितलेला प्रकार ऐकून तिच्या वडिलांना मानसिक धक्का बसला. ते कामाला गेले नाही. त्यामुळे त्यांचा मालक चौकशी करण्यासाठी घरी आला. तेव्हा त्यांनी मालकाच्या कानावर हा सर्व प्रकार घातला. त्यांनी मुलीच्या वडिलांना धीर देत पोलिसांकडे घेऊन गेले.
सिंहगड रोड पोलिसांनी तातडीने गुन्हा (FIR In Sinhagad Road Police Station) दाखल करुन आरोपीला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक नितीन जाधव (PSI Nitin Jadhav) तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Shocking 15 year old girl raped by neighbor Incident in Narhe area of Sinhagad Road Police Station limits

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

How To Digest Food Fast | 4 चमत्कारिक गोष्टी ज्या अनहेल्दी आणि हेवी अन्न पचवण्यात करतात मदत, बद्धकोष्ठता करतात दूर; जाणून घ्या

Folic Acid Benefits | पुरुषांमध्ये ‘ही’ एक महत्वाची गोष्ट वाढवते फॉलिक अ‍ॅसिड, जाणून घ्या याचे 5 मोठे फायदे आणि स्त्रोत

Trick For Weight Loss | Lockdown मध्ये वाढेलेले वजन कमी करायचंय तर ऑफिसमध्ये काम करताना वापरा ‘या’ ट्रिक्स; जाणून घ्या

The post Pune Crime | धक्कादायक ! शेजार्‍यानेच 15 वर्षाच्या मुलीवर केला बलात्कार; सिंहगड रोड पो. स्टेच्या नर्‍हे परिसरातील घटना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article