Header

Pune Crime | पूर्ववैमनस्यातून टोळक्याचा तरुणावर खुनी हल्ला; कोथरुडमधील सुतारदरा येथील घटना

Pune Crime | पूर्ववैमनस्यातून टोळक्याचा तरुणावर खुनी हल्ला; कोथरुडमधील सुतारदरा येथील घटना

Pune Crime | Murderous attack on a youth by a gang out of prejudice Incident at Sutardara in Kothrud Pune

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | पूर्ववैमनस्यातून गुंडांच्या टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने वार करुन त्याला जबर जखमी केल्याची घटना कोथरुडमधील सुतारदरा (Sutardara Kothrud) येथे घडली. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी (Kothrud Police) सहा जणांवर खूनाचा प्रयत्न (Attempt To Murder) केल्याचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

लखन लोहिरे Lakhan Lohire (वय २१, रा. शास्त्रीनगर स्मशानभूमी, कोथरुड), ऋषिकेश ठाकूर Rishikesh Thakur (वय २४), दिनेश बोडके Dinesh Bodke (वय २२), विजय लासुरे Vijay Lasure (वय २१, तिघेही रा. शिवसाम्राज्यनगर, सुतारदरा, कोथरुड),
रोहीत हनुमंत उभे Rohit Hanumant Ubhe (वय २७, रा. सणसनगर, भूगाव), सौरभ कुंभार Saurabh Kumbhar (रा. शिवशक्तीनगर, सुतारदरा, कोथरुड) अशी गुन्हा (Pune Crime) दाखल केलेल्यांची नावे आहेत. ऋषिकेश ठाकूर आणि रोहीत उभे हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून पोलिसांनी उभे याला अटक (Arrest) केली आहे.

याप्रकरणी संदेश लहु कडू Sandesh Lahu Kadu (वय २०, रा. सुतारदरा, कोथरुड) याने कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे मित्र आणि आरोपी यांची जुनी भांडणे आहे. फिर्यादी हे शुक्रवारी सायंकाळी सुतारदरा येथील अथर्व शाळेसमोर मित्रांसमवेत फिरत होते. यावेळी लखन लोहिरे याने फिर्यादी संदेश याला शिवीगाळ करुन हातातील कोयता डोक्यात मारुन गंभीर जखमी केले.

ऋषिकेश ठाकूर याने कोयत्याने संदेश याच्या हातावर वार केले. दिनेश, विजय, रोहीत आणि सौरभ यांनी फिर्यादीला दगडाने मारहाण केली. लखन, ऋषिकेश यांनी हातातील कोयते हवेत फिरवून कोणीमध्ये आल्यास खल्लास करेन अशी धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक कोकाटे (PSI Kokate) तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Murderous attack on a youth by a gang out of prejudice Incident at Sutardara in Kothrud Pune

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Pune Crime | धक्कादायक ! शेजार्‍यानेच 15 वर्षाच्या मुलीवर केला बलात्कार; सिंहगड रोड पो. स्टेच्या नर्‍हे परिसरातील घटना

How To Digest Food Fast | 4 चमत्कारिक गोष्टी ज्या अनहेल्दी आणि हेवी अन्न पचवण्यात करतात मदत, बद्धकोष्ठता करतात दूर; जाणून घ्या

Folic Acid Benefits | पुरुषांमध्ये ‘ही’ एक महत्वाची गोष्ट वाढवते फॉलिक अ‍ॅसिड, जाणून घ्या याचे 5 मोठे फायदे आणि स्त्रोत

The post Pune Crime | पूर्ववैमनस्यातून टोळक्याचा तरुणावर खुनी हल्ला; कोथरुडमधील सुतारदरा येथील घटना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article