Header

Pune Crime | पुणे लोहगाव विमानतळावर 48 लाख रुपयांचे 3 हजार हिरे जप्त

Pune Crime | पुणे लोहगाव विमानतळावर 48 लाख रुपयांचे 3 हजार हिरे जप्त

Pune Crime | 3,000 diamonds worth Rs 48 lakh seized by Custom Department at Pune Lohgaon Airport Sharjah To Pune Flight

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | शारजाहून (Sharjah) आलेल्या प्रवाशांवर पुणे लोहगाव विमानतळावर (Pune Lohegaon Airport) कारवाई करत कस्टम विभागाच्या (Custom Department) एअर इंटेलिजन्स विभागाने (Air Intelligence Department) तब्बल ३ हजार हिरे जप्त (Diamonds Seized) केले आहेत. (Pune Crime)

या हिर्‍यांची किंमत तब्बल ४८ लाख ६६ हजार रुपये इतकी आहे. शारजा, अबुधाबीहून (Abu Dhabi) पुण्यात येणार्‍या आंतरराष्ट्रीय विमानातून (Sharjah To Pune Flight) यापूर्वी सोन्याची तस्करी (Gold Smuggling) केली जात असल्याचे वारंवार उघडकीस आले आहे (Abu Dhabi To Pune Flight) . मात्र, अशा प्रकारे हिऱ्यांची तस्करी (Diamonds Smuggling) प्रथमच उघडकीस आली आहे. (Pune Crime)

ज्या प्रवाशाकडे हे हिरे (Diamonds) आढळून आले, तो प्रवासी शारजाहून आला होता, एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकार्‍यांना याबाबतची माहिती मिळाली होती. त्यानुसार, अधिकार्‍यांनी शारजाहून येणार्‍या प्रवाशांची अधिक बारकाईने तपासणी केली. त्यात या प्रवाशांने पॅक केलेल्या सामानातील ट्राऊझर्सच्या पाऊचमध्ये हिरे लपवून ठेवले असल्याचे आढळून आले. हे हिरे ७५ कॅरेट वजनाचे असून त्याची बाजारभावाप्रमाणे किंमत ४८ लाख ६६ हजार रुपये इतकी आहे. या प्रवाशाला अटक (Arrest) केली असून अधिक तपास सुरु आहे.

Web Title :- Pune Crime | 3,000 diamonds worth Rs 48 lakh seized by Custom Department at Pune Lohgaon Airport Sharjah To Pune Flight

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

How To Get Rid Of Blackheads | सहजपणे मिळवू शकता ‘ब्लॅकहेड्स’पासून मुक्ती, केवळ करा ‘हे’ 5 घरगुती उपाय; जाणून घ्या

Gold Silver Price Today | सोन्या चांदीचे दर पुन्हा वधारले; जाणून घ्या आजचे दर

Pune Crime | पुण्यात चारित्र्याच्या संशयावरुन 26 वर्षीय पत्नीचा खून ! मृतदेह साडीत गुंडाळून कात्रज बायपासवर दिला टाकून

The post Pune Crime | पुणे लोहगाव विमानतळावर 48 लाख रुपयांचे 3 हजार हिरे जप्त appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article