Header

Pune Crime | पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीत टोळी जेरबंद ! दरोड्यानंतर ओळख लपविण्यासाठी ठेवले होते सोबत दुसरे कपडे

Pune Crime | पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीत टोळी जेरबंद ! दरोड्यानंतर ओळख लपविण्यासाठी ठेवले होते सोबत दुसरे कपडे

Pune Crime | Gang arrested in preparation for robbery at petrol pump After the robbery other clothes were kept to hide the identity

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | लोणी काळभोर (Loni Kalbhor) येथील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या (Robbery On Petrol Pump) उद्देशाने पुणे – सोलापूर रोडवरील (Pune – Solapur Road) कवडीपाट (Kavadipat) येथे अंधारात एकत्र आलेल्या टोळीतील 6 जणांना पोलिसांनी जेरबंद केले. त्यांचे 4 साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. (Pune Crime)

कुणाल नारायण जाधव (वय २२, रा. काळेपडळ, हडपसर), ऋषीकेश राजेंद्र बरडे (वय २१, रा. संतोषनगर, कात्रज), विकी धनंजय म्हस्के (वय २९, रा. कोरेगाव), तेजस ऊर्फ भैया धनंजय म्हस्के (वय २६), केतन गौरव कोंढरे (वय १९, रा. त्रिमुर्ती चौक, भारती विद्यापीठ), पूर्वेश शशीकांत सपकाळे (वय २२, रा. फुरसुंगी, ता. हवेली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचे साथीदार पृथ्वीराज संजय कांबळे (रा. कात्रज), निखील मारुती शिंदे (रा. पापळ वसाहत, बिबवेवाडी), अभिषेक बबन गव्हाणे (रा. गंगाधाम) आणि सोनु राठोड हे चौघे पळून गेले. (Pune Crime)

याप्रकरणी पोलीस हवालदार संतोष मारुती होले यांनी लोणी काळभोर पोलिसांकडे (Loni Kalbhor Police) फिर्याद दिली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे (Loni Kalbhor Police Station) पथक पहाटे गस्त घालत होते. पुणे – सोलापूर रोडवरील कवडीपाठ येथील टोलनाक्याजवळ असलेल्या हॉटेल तुळजाभवानीचे बाजूला रोडच्याकडेला अंधारात काही जण थांबल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी त्यांना घेराव करुन पकडण्याचा प्रयत्न केला.

तेव्हा पोलिसांची चाहुल लागल्याने अंधाराचा फायदा घेऊन चौघे जण पळून गेले. पोलिसांनी ६ जणांना पकडले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे कोयता, मिरची पुड व बदलण्यासाठी कपडे आढळून आले. त्यांना पोलीस ठाण्यात आणून चौकशी केल्यावर माळीमळा येथील राजेंद्र पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने ते एकत्र आल्याची त्यांनी कबुली दिली. सहायक पोलीस निरीक्षक महानोर अधिक तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Gang arrested in preparation for robbery at petrol pump After the robbery other clothes were kept to hide the identity

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Pune Crime | शौचालयाच्या टाकीत गुदमरुन चौघांचा मृत्यु; घरमालक भीमाजी काळभोरविरुद्ध गुन्हा दाखल

बंद होणार Employee Pension Scheme ? रू. 15000 पेक्षा जास्त बेसिक सॅलरीवाल्यांसाठी ‘न्यू पेन्शन स्कीम’ येणार, 12 मार्चला निर्णय

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवड शहराची ‘कोरोना’ मुक्तीकडे वाटचाल, जाणून घ्या इतर आकडेवारी

The post Pune Crime | पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीत टोळी जेरबंद ! दरोड्यानंतर ओळख लपविण्यासाठी ठेवले होते सोबत दुसरे कपडे appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article