Header

Tata Group Multibagger Stock | तुम्ही सुद्धा झाला असतात करोडपती, जर Tata च्या ‘या’ कंपनीत लावले असते केवळ 10 हजार रुपये

Tata Group Multibagger Stock | तुम्ही सुद्धा झाला असतात करोडपती, जर Tata च्या ‘या’ कंपनीत लावले असते केवळ 10 हजार रुपये

Tata Group Multibagger Stock | multibagger stock titan share return more than one lakh percent last 20 years

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Tata Group Multibagger Stock | शेअर बाजारात प्रत्येक शेअर समान रिटर्न (Return) देत नाही. काही शेअर (Stocks) वर्षानुवर्षे एकाच कक्षेत फिरत राहतात. काही शेअरनी दशकांनंतरही नकारात्मक रिटर्न (Negative Return) देऊन गुंतवणूकदारांची निराशा केली आहे. पण या सगळ्यामध्ये असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी चांगला रिटर्न देऊन गुंतवणूकदारांना खुश केले आहे. (Tata Group Multibagger Stock)

वास्तविक, शेअर बाजारात (Share Market) गुंतवणूक करण्यापूर्वी फक्त योग्य स्टॉक निवडणे आवश्यक आहे. जर तुम्ही योग्य कंपनीत गुंतवणूक केली असेल, तर तुम्हाला निश्चितच दीर्घकालीन (Long Term) सर्वोत्तम परिणाम मिळतील. काही समभागांची वाटचाल पाहता त्यांनी दोन दशकांत बंपर रिटर्न दिला आहे. (Tata Group Multibagger Stock)

टाटा समूहाची कंपनी

असाच एक स्टॉक टायटन (Titan) चा आहे, जी टाटा समूहाची (Tata Group) कंपनी आहे. ज्याने दोन दशकात अपेक्षेपेक्षा जास्त पैसा कमावून दिला आहे. टायटन कंपनी ही टाटा समूह आणि तामिळनाडू औद्योगिक विकास महामंडळ (TIDCO) यांचा संयुक्त उपक्रम आहे. टायटन कंपनीच्या शेअरनी गेल्या 20 वर्षांत गुंतवणूकदारांना 1,00,000 टक्क्यांहून अधिक रिटर्न दिला आहे. 20 वर्षांपूर्वी टायटन शेअरमध्ये जर कोणी फक्त 10 हजार रुपये गुंतवले असते, तर आता ती गुंतवणूक 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली असती.

10 हजारची गुंतवणूक झाली असती एक कोटी

8 मार्च 2002 रोजी टायटन कंपनीचा शेअर (Titan Share) नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर 2.35 रुपये होता. आता या शेअरची किंमत 2,556 रुपये झाली आहे. अशा प्रकारे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 8 मार्च 2002 रोजी टायटनच्या शेअर्समध्ये फक्त 10,000 रुपये गुंतवले असते, तर त्याच्या शेअर्सचे मूल्य सध्या 1.08 कोटी रुपये झाले असते. जर तुम्ही या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आज ती गुंतवणूक 10.8 कोटी रुपयांपर्यंत वाढली असती.

डेटा पाहिल्यास, टायटन स्टॉकने गेल्या 20 वर्षांमध्ये सुमारे 108,765 टक्के रिटर्न दिला आहे.

टाटा समूहाचा टायटनमध्ये 25.02 टक्के हिस्सा आहे. टायटनमध्ये तामिळनाडू सरकारची हिस्सेदारी 27.88 टक्के आहे. भारतीय शेअर बाजारातील दिग्गज राकेश झुनझुनवाला यांची टायटनमध्ये मोठी गुंतवणूक आहे.

सध्या या कंपनीत झुनझुनवाला यांची एकूण हिस्सेदारी 5.09 टक्के आहे.

गेल्या एका वर्षात, टायटन स्टॉकचा उच्चांक रु. 2,687.25 आहे आणि नीचांक रु. 1400 आहे. 28 फेब्रुवारी रोजी हा शेअर 3.5% वाढीसह 2556 रुपयांवर बंद झाला. टायटन जेम्स अँड ज्वेलरी व्यवसायात आहे.

Web Title :- Tata Group Multibagger Stock | multibagger stock titan share return more than one lakh percent last 20 years

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Pune Crime | पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीत टोळी जेरबंद ! दरोड्यानंतर ओळख लपविण्यासाठी ठेवले होते सोबत दुसरे कपडे

Pune Crime | शौचालयाच्या टाकीत गुदमरुन चौघांचा मृत्यु; घरमालक भीमाजी काळभोरविरुद्ध गुन्हा दाखल

बंद होणार Employee Pension Scheme ? रू. 15000 पेक्षा जास्त बेसिक सॅलरीवाल्यांसाठी ‘न्यू पेन्शन स्कीम’ येणार, 12 मार्चला निर्णय

The post Tata Group Multibagger Stock | तुम्ही सुद्धा झाला असतात करोडपती, जर Tata च्या ‘या’ कंपनीत लावले असते केवळ 10 हजार रुपये appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article