Header

Pune Crime | ‘तुमच्या मुलाला ओळखतो, पोस्टात स्कीम सुरु झाल्याचे सांगून ज्येष्ठ महिलेला घातला गंडा’; सिटी पोस्ट ऑफिसच्या आवारात घडलेली घटना

Pune Crime | ‘तुमच्या मुलाला ओळखतो, पोस्टात स्कीम सुरु झाल्याचे सांगून ज्येष्ठ महिलेला घातला गंडा’; सिटी पोस्ट ऑफिसच्या आवारात घडलेली घटना

Pune Crime | Cheating Fraud Case Senior Citizen Woman Incident at the City Post Office Premises Pune Faraskhana Police Station

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | तुमच्या मुलाला ओळखतो, पोस्टात स्कीम (Investment In Post Office) सुरु झाली आहे, त्यात दागिने दाखवून पैसे मिळतात, असे सांगून एका चोरट्याने ज्येष्ठ नागरिक महिलेकडील (Senior Citizen Woman) २ लाख रुपयांचे दागिने घेऊन गंडा (Cheating Case) घालून पळून गेला. ही घटना सिटी पोस्ट ऑफिसच्या (City Post Office, Pune) आवारात शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. (Pune Crime)

याप्रकरणी रविवार पेठेतील एका ६८ वर्षाच्या महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी (Pune Police) दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या रस्त्यातून जात असताना एक जण त्यांच्याजवळ आला. मी तुमच्या मुलाला ओळखतो पोस्टात नवीन स्कीम सुरु झाली आहे (Post Office New Scheme). त्यात सोन्याचे दागिने दाखविले की पैसे मिळतात. मी अनेकांना पैसे मिळवून दिले आहे. तुम्हालाही पैसे मिळवून देतो, असे सांगितले. (Pune Crime)

त्याच्यावर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी स्वत:चे व सुनेचे असे एकूण ५० ग्रॅम वजनाचे २ लाख रुपयांचे दागिने एका पिशवीत ठेवून त्या ७ वर्षाच्या नातवाला बरोबर घेऊन त्या या चोरट्याबरोबर सिटी पोस्ट ऑफिसमध्ये आल्या. तेथे या चोरट्याने त्यांना तुमच्या आधार कार्डाची (Aadhaar Card) झेरॉक्स लागेल, असे सांगितले.

तेव्हा त्यांनी दागिने असलेली पिशवी नातवाकडे दिली व त्या झेरॉक्स आणायला बाहेर गेल्या. तेव्हा या चोरट्याने आत दागिने दाखवून येतो, असे सांगून दागिने असलेली पिशवी घेऊन तो पळून गेला. झेरॉक्स घेऊन परत आल्यावर त्यांना हा सर्व प्रकार समजला (Fraud Case). चोरट्याने मास्क लावला असल्याने या आजींना त्याला ओळखता आले नाही. मुलाच्या ओळखीचा म्हणून त्यांनी विश्वास ठेवला होता. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Cheating Fraud Case Senior Citizen Woman Incident at the City Post Office Premises Pune Faraskhana Police Station

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Pune Crime | पूर्ववैमनस्यातून टोळक्याचा तरुणावर खुनी हल्ला; कोथरुडमधील सुतारदरा येथील घटना

Pune Crime | धक्कादायक ! शेजार्‍यानेच 15 वर्षाच्या मुलीवर केला बलात्कार; सिंहगड रोड पो. स्टेच्या नर्‍हे परिसरातील घटना

How To Digest Food Fast | 4 चमत्कारिक गोष्टी ज्या अनहेल्दी आणि हेवी अन्न पचवण्यात करतात मदत, बद्धकोष्ठता करतात दूर; जाणून घ्या

The post Pune Crime | ‘तुमच्या मुलाला ओळखतो, पोस्टात स्कीम सुरु झाल्याचे सांगून ज्येष्ठ महिलेला घातला गंडा’; सिटी पोस्ट ऑफिसच्या आवारात घडलेली घटना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article