Header

BJP MLA Ganesh Naik | अटक टाळण्यासाठी भाजप आमदार गणेश नाईकांनी उचललं हे पाऊल !

BJP MLA Ganesh Naik | अटक टाळण्यासाठी भाजप आमदार गणेश नाईकांनी उचललं हे पाऊल !

BJP MLA Ganesh Naik | bjp mla ganesh naik anticipatory bail application in thane sessions court navi mumbai

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन BJP MLA Ganesh Naik | माजी मंत्री आणि ऐरोली (Airoli) भाजपचे आमदार गणेश नाईक (BJP MLA Ganesh Naik) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्याविरोधात एका महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये (Nerul Police Station) गुन्हा दाखल झाल्यानंतर नवी मुंबई पोलिसांकडून (Navi Mumbai Police) त्यांचा शोध घेतला जात आहे. अशातच गणेश नाईक यांनी अटकपूर्व जामीनासाठी ठाणे सत्र न्यायालयात (Thane Sessions Court) अर्ज दाखल केला आहे.

 

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

गणेश नाईक यांच्या अटकपूर्व जामिनावर दुपारी दोन वाजता सुनावणी होणार आहे. त्यामुळे न्यायालय नाईकांना (BJP MLA Ganesh Naik) दिलासा देतं की जेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यांच्यावर पिडीत महिलेने गंभीर आरोप केले असून त्यांनी राज्य महिला आयोगाकडे (Maharashtra State Women’s Commission) धाव घेतली आहे. पोलिसांनी गणेश नाईक यांना अटक करावी, असं रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी म्हटलं आहे.

 

काय आहे प्रकरण ?
पीडित महिला 1993 मध्ये वाशी (Vashi) सेक्टर – 17 मधील बिग फ्लॅश स्पोर्ट्स क्लब (Big Flash Sports Club) येथे रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होत्या.
यावेळी नाईक हे अनेकवेळा बैठकीसाठी येत असायचे. त्यानंतर ओळख झाल्यावर अनेकवेळा त्यांनी मला संपर्क केला.
1995 मध्ये आमच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. त्यावेळी नाईक यांनी पारसिक हिल (Parsik Hill) येथील बंगल्यात नेत शरीरसंबंध प्रस्थापित केले.
त्यानंतर आम्ही पुण्यात (Pune) फिरायला गेलो होतो तेव्हाही आमच्यात दोघांच्या सहमतीने शरीरसंबंध प्रस्थापित केले.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

नोव्हेंबर 2006 मध्ये गणेश नाईक यांच्यापासून गर्भवती (Pregnant) राहिल्यानंतर सहाव्या महिन्यात एप्रिल 2007 मध्ये त्यांच्या सांगण्यावरून मी न्यू जर्सी (New Jersey US) येथे राहण्यास गेले.
18 ऑगस्ट 2007 मध्ये मी मुलाला जन्म दिला. त्यानंतर मुलगा दोन महिन्यांचा असताना नाईक त्याला घेण्यासाठी स्वत: अमेरिकेला आले होते.
तिथून परतल्यानंतर आम्हाला नेरूळमधील सीब्रीज टॉवर (Sea Breeze Tower) इमारतीत राहायला सांगितलं.
नाईक आठवड्यातून तीन वेळा घरी यायचे आणि त्यावेळी त्यांनी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत लैंगिक शोषण (Sexual Abuse) केलं असल्याचं पिडीत महिलेने तक्रारीमध्ये म्हटलं आहे.

 

Web Title :- BJP MLA Ganesh Naik | bjp mla ganesh naik anticipatory bail application in thane sessions court navi mumbai

 

हे देखील वाचा :

Pune Crime | कंपनीला माल सप्लाय करण्यासाठी खंडणीची मागणी ! गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक – 2 कडून खंडणीबहाद्दरांच्या म्होरक्यासह तिघांना अटक

Pune Crime | स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश ! जस्ट डायलवर चौकशी केली की मिळत होता Merian Body Spa चा ‘मेसेज’

Supriya Sule On Raj Thackeray | अजित पवारांवर रेड पडते पण सुप्रिया सुळेंवर नाही म्हणणाऱ्या राज ठाकरेंना सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर ! म्हणाल्या – ‘माझ्या भावाच्या घरी आजपर्यंत…’

 

The post BJP MLA Ganesh Naik | अटक टाळण्यासाठी भाजप आमदार गणेश नाईकांनी उचललं हे पाऊल ! appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article