Header

Dr. Madhav Godbole | निवृत्त केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांचे पुण्यात 85 व्या वर्षी निधन

Dr. Madhav Godbole | निवृत्त केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांचे पुण्यात 85 व्या वर्षी निधन

Dr. Madhav Godbole | Retired Union Home Secretary Dr Madhav Godbole Passed Away In Pune At 85

पुणे : बहुजननामा ऑनलाइन  माजी केंद्रीय गृहसचिव डॉ. माधव गोडबोले (Dr. Madhav Godbole) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन (Died) झाले. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ते 85 वर्षाचे होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झाल्याची माहिती गोडबोले कुटुंबीयांनी दिली. त्यांच्या पश्चात पत्नी सुजाता, मुलगा राहुल, मुलगी मीरा, सून दक्षिणा, जावई महेश आणि नातवंडे आदिती, मनन, गायत्री आणि तारिणी असा त्यांचा परिवार आहे. (Retired Union Home Secretary Dr Madhav Godbole Passed Away In Pune At 85)

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

डॉ. माधव गोडबोले (Dr. Madhav Godbole) हे निवृत्त भारतीय प्रशासकीय अधिकारी होते. 1959 साली ते भारतीय प्रशासकीय सेवेत उतरले आणि मार्च 1993 मध्ये भारताच्या केंद्र सरकारचे गृहसचिव आणि न्याय सचिव असताना स्वेच्छानिवृत्ती घेतली. दरम्यान, त्याआधी त्यांनी केंद्र सरकारमध्ये पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव व नगर विकास मंत्रालयाचे सचिव म्हणून काम पाहिले होते. तसेच, महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनात मुख्य वित्तसचिव पदावर जबाबदारी सांभाळली. गोडबोले हे महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे अध्यक्ष होते.

 

 

Web Title : Dr. Madhav Godbole | Retired Union Home Secretary Dr Madhav Godbole Passed Away In Pune At 85

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीचे भाव वधारले; जाणून घ्या नवे दर

Unhealthy Habits | निरोगी राहण्यासाठी चुकीच्या सवयी टाळा; नाहीतर आरोग्यावर होईल दुष्परिणाम, जाणून घ्या

Benefits Of Ghosali | घोसाळीची भाजी खाण्याचे एक नव्हे, अनेक आहेत फायदे, आजपासूनच करा डाएटमध्ये समावेश

 

The post Dr. Madhav Godbole | निवृत्त केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांचे पुण्यात 85 व्या वर्षी निधन appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article