Gold Silver Price Today | सोन्याचे भाव ‘जैसे थे’ तर, चांदी घसरली; जाणून घ्या लेटेस्ट रेट

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन– Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात सोन्या – चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) सतत बदल होत असतात. गेले काही दिवस झाले सोन्याच्या दरात चढउतार दिसून आले. दरम्यान आज सोन्याची किंमत स्थिर आहे. तर चांदीच्या दरात किरकोळ घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज (बुधवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,800 रुपये आहे. तर चांदीची किंमत (Silver Price) 66,300 रुपये पर्यंत पोहचली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आंतरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमती सतत बदलत असतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात चढउतार दिसून आली. पुन्हा त्यामध्ये वाढ झाली आहे. आता सोन्याची किंमत स्थिर तर चांदीच्या दरात किरकोळ घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, सध्या सोन्याचा दर 50 हजाराच्या आत आहे. (Gold Silver Price Today)
दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आजचा सोन्याचा भाव –
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,850 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,190 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,850 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,190 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,800 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,140 रुपये
आजचा चांदीचा दर – 66,300 रुपये (प्रति किलो)
Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 6 april 2022
हे देखील वाचा :
The post Gold Silver Price Today | सोन्याचे भाव ‘जैसे थे’ तर, चांदी घसरली; जाणून घ्या लेटेस्ट रेट appeared first on बहुजननामा.