Header

Maharashtra Rain Alert | महाराष्ट्रात कधी ऊन तर, कधी पाऊस ! आता गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता

Maharashtra Rain Alert | महाराष्ट्रात कधी ऊन तर, कधी पाऊस ! आता गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता

Maharashtra Rain Alert | weather update maharashtra rain alert next 6 days in konkan western maharashtra and vidarbha

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra Rain Alert | महाराष्ट्रात उन्हाचा चटका लागला आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या जीवाची काहीली होत आहे. दरम्यान, आता वातावरणात बदल (Maharashtra Weather) झाल्यामुळे राज्यात पुन्हा पाऊस (Rain) बरसणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. आगामी 4 ते 5 दिवसांत काही ठिकाणी गडगडाटासह जोरदार वारे आणि पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. याबाबत माहिती भारतीय हवामान विभागाकडून Indian Meteorological Department (IMD) देण्यात आली आहे.

मार्च महिना सुरू होताच तापमानात वाढ झाली. पूर्ण मार्च महिन्यामध्ये उन्हाचा तडाखा जाणवला. अकोला (Akola), नागपूर (Nagpur), चंद्रपूर (Chandrapur), वर्धा (Wardha), बुलढाणा (Buldana) या जिल्ह्यांतील नागरिकांना उन्हाच्या सर्वाधिक झळा बसल्या. तापमान तब्बल 42 अंशाच्या वर पोहोचले होते. मात्र, आता चंद्रपूरसह गडचिरोली जिल्ह्यात (Gadchiroli) उकाडा कमी झाला आहे. दरम्यान, आज (सोमवार) दोन्ही जिल्ह्यामध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आलीय. (Maharashtra Rain Alert)

दरम्यान, कोकणातील (Konkan) नागरिकांना देखील उकड्यापासून दिलासा मिळणार असुन उद्या (मंगळवारी) 5 एप्रिल रोजी कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापुरमध्ये देखील दमदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. तसेच या जिल्ह्यांना यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर 6 एप्रिल रोजीही या चारही जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे वेगवान वाऱ्यासह आणि गडगडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवण्यात आली आहे.

Web Title :- Maharashtra Rain Alert | weather update maharashtra rain alert next 6 days in konkan western maharashtra and vidarbha

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Gold Silver Price Today | जाणून घ्या सोन्या-चांदीचे लेटेस्ट रेट दर

Petrol Diesel Price Hike Pune | पेट्रोल, डिझेलची घोडदौड सुरुच ! आठवड्याची सुरुवातही भाववाढीने, जाणून घ्या नवीन दर

Pune Crime | पुण्यात नामांकित कंपनीच्या नावाने बनावट जिन्स पँटची विक्री, 25 लाखाचा मुद्देमाल जप्त

Morning Health Tips | हेल्दी आणि एनर्जेटिक राहण्यासाठी ‘या’ गोष्टींनी करा आपल्या दिवसाची सुरूवात

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांसाठी महत्वाची बातमी ! DA च्या नंतर HRA वाढणार काय ? तसं झालं तर होईल 20484 रूपयांचा फायदा

The post Maharashtra Rain Alert | महाराष्ट्रात कधी ऊन तर, कधी पाऊस ! आता गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article