Header

Pune Crime | धक्कादायक ! पोपटाची पिल्ले पुलाखाली आहेत, असे सांगून 15 वर्षाच्या मुलाला दिले नदीत ढकलून

Pune Crime | धक्कादायक ! पोपटाची पिल्ले पुलाखाली आहेत, असे सांगून 15 वर्षाच्या मुलाला दिले नदीत ढकलून

Pune Crime Shocking The 15 year old boy was pushed into the river saying the parrots chicks were under the mula river railway bridge

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | मुळा नदीवरील (Mula River) रेल्वे पुलावर (Railway Bridge) एका १५ वर्षाच्या मुलाला घेऊन जाऊन त्याला पोपटाची पिल्ले (Parrot Chicks) पुलाखाली आहेत, असे सांगून तो डोकावून पहात असताना त्याला ढकलून देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलाचा आरडाओरडा ऐकून दोघा जणांनी बोटीने त्याच्याजवळ जाऊन या मुलाला वाचविले. याप्रकरणी खडकी पोलिसांनी (Khadki Police) प्रशांत ज्ञानेश्वर निकाळजे Prashant Dnyaneshwar Nikalje (वय १९, रा. बोपोडी) याच्याविरुद्ध खूनाचा प्रयत्न (Attempt To Kill) केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

याबाबत डॉर्थी सायमन एलआरशाम (वय ३७, रा. बोपोडी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांचा मुलगा नेल्सन (वय १५) याला निकाळजे हा मुळा नदीवरील रेल्वे पुलावर शनिवारी सकाळी साडेदहा वाजता घेऊन गेला. तेथून त्याला पोपटाची पिल्ले पुलाखाली आहे, असे सांगितले. (Pune Crime)

नेल्सन हा पुलावरुन खाली डोकावून पहात असताना निकाळजे याने त्याला पुलावरुन खाली नदीच्या पाण्यात ढकलून दिले.
नेल्सन नदीच्या पाण्यात पडला.
सुदैवाने तेथे गवत होते. त्याने गवताला पकडून बाजूला आला व जोरजोरात वाचवा वाचवा असे ओरडू लागला.
त्याचा आवाज ऐकून दोघे जण बोट घेऊन त्याच्या जवळ आले व त्याला पाण्यातून बाहेर काढून त्याचा जीव वाचविला.
पोलीस उपनिरीक्षक सुडगे तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Shocking The 15 year old boy was pushed into the river saying the parrots chicks were under the mula river railway bridge

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा


The post Pune Crime | धक्कादायक ! पोपटाची पिल्ले पुलाखाली आहेत, असे सांगून 15 वर्षाच्या मुलाला दिले नदीत ढकलून appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article