Header

Pune Crime | लग्नास नकार देणाऱ्या महिलेला मारहाण, विनयभंग करणाऱ्या 40 वर्षाच्या नराधमाविरूध्द हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा

Pune Crime | लग्नास नकार देणाऱ्या महिलेला मारहाण, विनयभंग करणाऱ्या 40 वर्षाच्या नराधमाविरूध्द हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा

Pune Crime | Hadapsar police case against 40 year old man for assaulting woman who refused to marry

पुणे : बहुजननामा ऑनलाइन Pune Crime | पुण्यात महिलांवर अत्याचार होण्याचे प्रकार वाढत आहेत. हडपसर पोलीस ठाण्याच्या (Hadapsar Police Station) हद्दीत राहणाऱ्या एका 30 वर्षाच्या महिलेने लग्नास नकार (Refuse Marriage) दिल्याच्या रागातून एका व्यक्तीने तिला मारहाण (Beating) करुन तिचा विनयभंग (Molestation) केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी (Pune Police) पीडितेच्या तक्रारीवरुन राजेंद्र दादाराव शिंदे (Rajendra Dadarao Shinde) याच्यावर आयपीसी IPC 354 354 (अ), 323, 506 नुसार गुन्हा (FIR) दाखल (Pune Crime) केला आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

याबाबत मगरपट्टा (Magarpatta City) परिसरात राहणाऱ्या 30 वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.27) फिर्याद दिली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.26) रात्री अकराच्या सुमारास वैदवाडी कॅनॉल (Vaidwadi Canal) जवळ घडला आहे. पीडितेच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी राजेंद्र शिंदे (वय – 40 रा. हडपसर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी एकाच परिसरात राहतात. फिर्यादी या रस्त्याने जात असताना आरोपीने त्यांना आडवलं. ‘तू मला आवडेस माझ्या सोबत पळुन चल आपण लग्न करु’ असे म्हणाला असता फिर्यादी यांनी त्याला नकार दिला. यानंतर आरोपीने ‘तू एकटी कशी राहतेस ते बघतो’ असे म्हणत धमकी दिली. घाबरलेल्या महिलेने आरडा ओरडा करुन आरोपीला शिवीगाळ केली. चिडलेल्या आरोपीने फिर्यादी यांना हाताने मारहाण करुन त्यांच्यासोबत गैरवर्तन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पोमण (PSI Poman) करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Hadapsar police case against 40 year old man for assaulting woman who refused to marry

 

हे देखील वाचा :

Pune Crime | ज्युस सेंटरच्या मालकाच्या डोक्यात हातोड्याने घातला घाव; शिवाजीनगर परिसरातील घटनेत मालकाच्या कवटीला इजा

Koregaon-Bhima Violence Case | कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात शरद पवारांची ‘या’ तारखेला पुन्हा साक्ष नोंदवणार

Pune Crime | फेकलेले गरम ताट 3 वर्षाच्या बाळाच्या अंगावर पडले अन्…; सिद्धार्थनगरमधील घटना

 

The post Pune Crime | लग्नास नकार देणाऱ्या महिलेला मारहाण, विनयभंग करणाऱ्या 40 वर्षाच्या नराधमाविरूध्द हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article