Header

Pune Crime | ज्युस सेंटरच्या मालकाच्या डोक्यात हातोड्याने घातला घाव; शिवाजीनगर परिसरातील घटनेत मालकाच्या कवटीला इजा

Pune Crime | ज्युस सेंटरच्या मालकाच्या डोक्यात हातोड्याने घातला घाव; शिवाजीनगर परिसरातील घटनेत मालकाच्या कवटीला इजा

Pune Crime | A hammer blow to the head of the juice center owner; Injury of owner's skull in Shivajinagar area incident

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | स्वामी समर्थ ज्युस सेंटरच्या मालकाच्या डोक्यात हातोड्याने वार करुन त्यांचा खूनाचा प्रयत्न (Attempt To Kill) करण्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती शिवाजी महाराज ब्रिजजवळ (Chhatrapati Shivaji Maharaj Bridge Pune) बुधवारी रात्री घडला. यामध्ये ज्युस सेंटरचे मालक हे गंभीर जखमी झाले असून हल्लेखोराने इतक्या द्वेषाने वार केला की त्यात त्यांची कवटी फुटली आहे. (Pune Crime)

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

हेमंत राजेंद्र कणसे Hemant Rajendra Kanse (रा. चौधरी वस्ती, खराडी) असे स्वामी समर्थ ज्युस सेंटरच्या मालकाचे नाव आहे. ही घटना शिवाजी पुलाच्या खालील ममता हॉटेलच्या बाजूला स्वामी समर्थ ज्युस सेंटरच्या समोर बुधवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. (Pune Crime)

 

 

याप्रकरणी दीपक प्रल्हाद सोळंके (वय २३, रा. कसबा पेठ) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (गु. रजि. नं. ५८/२२) फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी हे हेमंत कणसे यांच्या स्वामी समर्थ ज्युस सेंटरवर काम करतात. बुधवारी रात्री ते व कणसे ज्युस सेंटरवर असताना एक जण आला. त्याने लोखंडी हातोड्याने हेमंत कणसे यांच्या डोक्यात, कानाजवळ, डोक्याच्या पाठीमागे एका मागोमाग एक असे तीन वार केले. त्यामुळे कणसे जखमी होऊन खाली पडले. त्यांना वाचविण्यासाठी दीपक धावले असताना हल्लेखोराने त्यांच्याही डाव्या हाताच्या दंडावर हातोड्याने मारुन जखमी केले. त्यानंतर हल्लेखोर मोटारसायकलवरुन पळून गेला.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

हल्लेखोराने तोंडाला रुमाल बांधला होता. तसेच त्याने रात्र असतानाही टोपी घातली होती. त्यामुळे त्याची ओळख पटू शकली नाही. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. वैयक्तिक कारणावरुन हा हल्ला झाला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. मोटारसायकलचा माग काढून हल्लेखोराचा शोध घेतला जात आहे. सहायक पोलीस निरीक्षक अहिवळे अधिक तपास करीत आहेत.

 

 

Web Title : Pune Crime | A hammer blow to the head of the juice center owner; Injury of owner’s skull in Shivajinagar area incident

 

हे देखील वाचा :

Koregaon-Bhima Violence Case | कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात शरद पवारांची ‘या’ तारखेला पुन्हा साक्ष नोंदवणार

Pune Crime | फेकलेले गरम ताट 3 वर्षाच्या बाळाच्या अंगावर पडले अन्…; सिद्धार्थनगरमधील घटना

Gold Silver Price Today | सोन्या चांदीच्या किमतीत पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचे दर

 

The post Pune Crime | ज्युस सेंटरच्या मालकाच्या डोक्यात हातोड्याने घातला घाव; शिवाजीनगर परिसरातील घटनेत मालकाच्या कवटीला इजा appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article