Header

Pune Crime | बनावट ई मेलआयडीद्वारे ईपीपीएस इन्फोटेक कंपनीची बदनामी करुन दीड कोटींचे नुकसान

Pune Crime | बनावट ई मेलआयडीद्वारे ईपीपीएस इन्फोटेक कंपनीची बदनामी करुन दीड कोटींचे नुकसान

Pune Crime | Loss of Rs 1.5 crore by defaming EPPS Infotech Company through fake e-mail ID FIR In Viman Nagar Police Station

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | कंपनीच्या नावाशी मिळते जुळते असलेले ई मेल आयडी (email ID) तयार करुन त्याद्वारे ईपीपीएस इन्फोटेक कंपनीची (EPPS Infotech Pvt. Ltd) बदनामी (Defamation) करुन कंपनीचे दीड कोटी रुपयांचे नुकसान केल्याचा प्रकार समोर आला आहे (Pune Crime). याप्रकरणी गायत्री सुरेशकुमार पिल्ले (वय २५, रा. ईपीपीएस इन्फोटेक, विमाननगर) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार संदीप परमार (Sandeep Parmar) Mob No. 7042272764 याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप परमार याने ईपीपीएस इन्फोटेक प्रा. लि. या कंपनीचे नावाशी मिळते जुळते असलेला ई मेल आयडी तयार करुन तो मेल आयडी फिर्यादीच्या कंपनीचा असल्याचे भासविले (Pune Crime). त्याद्वारे आपली स्वत:ची ओळख लपवून कंपनीची बदनामी व्हावी, असा मजकूर असलेले मेल कंपनीचे कर्मचारी, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक, संचालक, कंपनीचे मालक, कंपनीचे ग्राहक कंपनीचे डीलर्स, कंपनीचे पाटनर्स यांना पाठविले.

त्याद्वारे त्यांच्या मनात कंपनीचे आर्थिक व्यवहाराबद्दल भिती निर्माण केली. बदनामीकारक ई मेल पाठवून त्याद्वारे अंदाजे दीड कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक जगताप तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Loss of Rs 1.5 crore by defaming EPPS Infotech Company through fake e-mail ID FIR In Viman Nagar Police Station

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Pune Fire News | खराडी येथे जोगेश्वरी मिसळसह 12 दुकानांना भीषण आग; आग आटोक्यात

CNG Price Hike In Pune | सीएनजीच्या दरात पुन्हा भाववाढ; 15 दिवसात 13 रुपयांची वाढ

Bank Timing Change | RBI चा मोठा निर्णय ! आजपासून बँक उघडण्याच्या वेळेत बदल, जाणून घ्या

SBI MCLR Rate | एसबीआयच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी ! महाग होणार तुमचे लोन, SBI बँकेने MCLR मध्ये केली 0.10% वाढ

Rupali Chakankar On BJP MLA Ganesh Naik | ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ प्रकरणी गणेश नाईक यांना अटक होणार, चौकशी करणार – रूपाली चाकणकर

The post Pune Crime | बनावट ई मेलआयडीद्वारे ईपीपीएस इन्फोटेक कंपनीची बदनामी करुन दीड कोटींचे नुकसान appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article