Header

Pune Crime | विरोधी टोळीचे काम करत असल्याच्या कारणावरुन तरुणावर कोयत्याने वार; जनता वसाहतीत पुन्हा दोन टोळ्यात राडा

Pune Crime | विरोधी टोळीचे काम करत असल्याच्या कारणावरुन तरुणावर कोयत्याने वार; जनता वसाहतीत पुन्हा दोन टोळ्यात राडा

Pune Crime | The young man was stabbed with a machete for acting as an opponent; Rada again in two groups in Janta Vasahat Parvati Dattawadi Police Station

पुणे : बहुजननामा ऑनलाइन Pune Crime | पर्वती येथील जनता वसाहतीत (Janta Vasahat Parvati) गुंडाच्या टोळ्यांमध्ये (Pune Criminals Gang) एकमेकांशी नेहमीच संघर्ष सुरु असतो. त्यातूनच वर्चस्ववादातून निलेश वाडकर याचा खून करण्यात आला होता (Nilesh Wadkar Murder Case). आता त्याची पुढची पिढीही गुन्हेगारीमध्ये उतरली आहे. त्यातूनच दुसर्‍या टोळीचे काम करतो, म्हणून एका तरुणावर कोयत्याने वार (Attempt To Kill) करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. (Pune Crime)

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी (Dattawadi Police) सागर उभे Sagar Ubhe (वय २०, रा. जनता वसाहत), किरण काळे Kiran Kale (वय २०, रा. मुंबई), सॅन्डी याच्यांवर गुन्हा दाखल केला असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी अशोक शिवाजी चव्हाण (वय २८, रा. जनता वसाहत) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात Dattawadi Police Station (गु. रजि. नं. ९०/२२) फिर्याद दिली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक चव्हाण हे सोमवारी रात्री साडेआठ वाजता जनता वसाहतीतील विठ्ठल मंदिराजवळ बसले असताना आरोपी तेथे आले.
त्यांनी दया भाऊने तुला बोलावले आहे, असे बोलून त्यांना घेऊन गेले. तेथे दया वाडकर (Daya Wadkar) नाही तर नवनाथ वाडकर (Navnath Wadkar) होता.
त्याने तु दया वाडकरचे काम करतो. पण माझे काम ऐकत नाही, असे म्हणून चव्हाण याला शिवीगाळ केली.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

कमरेचा कोयता काढला. इतर आरोपींनी त्याला धरुन ठेवले. वाडकर याने फिर्यादीच्या डोक्यात कोयता मारुन गंभीर जखमी केले.
हा प्रकार पाहून तेथे अनेक जण जमले. तेव्हा आमच्या भांडणामध्ये कोणी पडायचे नाही.
कोणी मध्ये आला तर खल्लास करुन टाकू असे बोलून दहशत माजवली. पोलीस उपनिरीक्षक खरात (PSI Kharat) अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | The young man was stabbed with a machete for acting as an opponent; Rada again in two groups in Janta Vasahat Parvati Dattawadi Police Station

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किमतीत किरकोळ घसरण; जाणून घ्या आजचे दर

Navneet Rana on Sanjay Raut | नवनीत राणा यांची संजय राऊत यांच्याविरोधात नागपूर पोलिस आयुक्तांकडे तक्रार; गुन्हा दाखल करण्याची मागणी

Ajit Pawar | ‘साहेबांसमोर सांगतो, मला विक्रम काळेची भीतीच वाटते’, असं का म्हणाले अजित पवार

 

The post Pune Crime | विरोधी टोळीचे काम करत असल्याच्या कारणावरुन तरुणावर कोयत्याने वार; जनता वसाहतीत पुन्हा दोन टोळ्यात राडा appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article