Header

Chitra Wagh On Mumbai CP Sanjay Pandey | चित्रा वाघ यांचा मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना सवाल; म्हणाल्या – ‘आपल्या खोटारड्या मालकांची पापं झाकण्यासाठी अजून किती…’

Chitra Wagh On Mumbai CP Sanjay Pandey | चित्रा वाघ यांचा मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना सवाल; म्हणाल्या – ‘आपल्या खोटारड्या मालकांची पापं झाकण्यासाठी अजून किती…’

MP navneet rana mumbai police allegations bjp leader chitra wagh attacking slams cp sanjay pandey for video on twitter mahavikas aaghadi government

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन Chitra Wagh On Mumbai CP Sanjay Pandey | खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी जेलमध्ये असताना अतिशय हीन दर्जाची वागणूक मिळाली. पोलिसांनी पाणीही दिले नाही अन् वॉशरुमही वापरु दिले नसल्याचा खळबळजनक आरोप मुंबई पोलिसांवर (Mumbai Police) केला होता. तसेच याची दखल घेण्यासाठी त्यांनी थेट लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Lok Sabha Speaker Om Birla) यांना पत्र लिहिले होते. या सर्व घडामोडीनंतर मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे (Mumbai CP Sanjay Pandey) यांनी खार पोलीस ठाण्यातील (Khar Police Station) एक व्हिडीओ ट्विट करुन नवनीत राणा यांचे आरोप फेटाळून लावले. त्यावर भाजपच्या (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) या चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. चित्रा वाघ यांनी थेट पोलीस आयुक्तांवर निशाणा साधला आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

 

नेमकं काय घडलं ?

नवनीत राणा यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी एक व्हिडिओ ट्विट केला. यामध्ये राणा दाम्पत्य (Rana Couple) पोलीस ठाण्यात चहा पिताना दिसत आहेत. तसेच त्यांच्यासमोर पाण्याच्या बाटल्या ठेवल्या होत्या. राणा दाम्पत्य खुर्चीत बसून चहा पिताना दिसत आहे.

 

 

आजून किती खोटेपणा कराल आयुक्त साहेब?

पोलीस आयुक्तांनी व्हिडिओ ट्विट केल्यानंतर त्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी भाजपच्यावतीने उत्तर दिले आहे. खा. नवनीत राणा यांची तक्रार सांताक्रूझ पोलीस स्टेशन (Santacruz Police Station) मधल्या लॉकअपबाद्दल आहे आणि मुंबई पोलीस आयुक्त (@cpMumbaiPolice) सोशल मीडियावर (Social Media) त्याच्या आधीचा खार पोलीस ठाण्यातील राणा दाम्पत्याचा चहा पितानाचा व्हिडिओ लोड करतात… आपल्या खोटारड्या मालकांची पापं झाकण्यासाठी अजून किती खोटेपणा कराल आयुक्त साहेब…? असा थेट सवाल त्यांनी संजय पांडे यांना केला आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

Web Title :  MP navneet rana mumbai police allegations bjp leader chitra wagh attacking slams cp sanjay pandey for video on twitter mahavikas aaghadi government

 

हे देखील वाचा :

Pune Crime | विरोधी टोळीचे काम करत असल्याच्या कारणावरुन तरुणावर कोयत्याने वार; जनता वसाहतीत पुन्हा दोन टोळ्यात राडा

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किमतीत किरकोळ घसरण; जाणून घ्या आजचे दर

Navneet Rana on Sanjay Raut | नवनीत राणा यांची संजय राऊत यांच्याविरोधात नागपूर पोलिस आयुक्तांकडे तक्रार; गुन्हा दाखल करण्याची मागणी

 

The post Chitra Wagh On Mumbai CP Sanjay Pandey | चित्रा वाघ यांचा मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना सवाल; म्हणाल्या – ‘आपल्या खोटारड्या मालकांची पापं झाकण्यासाठी अजून किती…’ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article