Header

Pune Crime | ‘मी भाई आहे या कॉलेजचा’ ! गल्ली बोळाबरोबरच आता कॉलेजमध्येही भाईगिरी सुरु; पुण्यातील नामांकित महाविद्यालयात सराईत गुन्हेगाराची दहशत

Pune Crime | ‘मी भाई आहे या कॉलेजचा’ ! गल्ली बोळाबरोबरच आता कॉलेजमध्येही भाईगिरी सुरु; पुण्यातील नामांकित महाविद्यालयात सराईत गुन्हेगाराची दहशत

Pune Crime | I am the bhai of this college Terror of pune criminals in a reputed college in Pune

पुणे : बहुजननामा ऑनलाइन Pune Crime | शहरातील गल्लीबोळांमध्ये मी भाई आहे, असे म्हणून दादागिरी (Dadagiri) करणारे असंख्य तरुण आहेत. आता कॉलेजमध्येही भाईगिरी (Bhaigiri) सुरु झाल्याचे आढळून आले आहे. ‘‘मी भाई आहे या कॉलेजचा ’’ म्हणत एका टोळक्याने तरुणाला लाकडी बांबुने व लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन दहशत पसरविली. (Pune Crime)

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

हा प्रकार आंबेगाव येथील सिंहगड कॉलेज ऑफ आर्टस, कॉमर्स अँड सायन्स (sinhgad college of arts commerce and science) येथे गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता घडला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police Station) विकास ऊर्फ विकी चावडा, मोहन राठोड, चेतन थोरे व साहिल गायकवाड या चौघांना अटक केली आहे (Pune Crime). विकास चावडा हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार (Pune Criminals) आहे. याप्रकरणी धनकवडी (Dhankawadi) येथील एका १९ वर्षाच्या तरुणाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (गु. रजि. नं. २८४/२२) फिर्याद दिली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास चावडा याने फिर्यादीला फोन करुन कॉलेजमध्ये बोलावून घेतले.
तो तेथे गेल्यावर फिर्यादीस दमदाटी करुन विकास याने तु माझे ऐकत नाही का ?, मी भाई आहे या कॉलेजचा असे म्हणून त्याने व त्याच्या साथीदारांनी हाताने बेदम मारहाण केली.
त्यानंतर त्याला दुचाकीवर बसवून कॉलेजच्या पार्किंगमधून बाहेरील गल्लीत आणले.
तेथे थांब तुला जीवे मारुन टाकतो, तू माझे ऐकत नाही का, असे म्हणून मी भाई आहे इकडचा असे म्हणत त्याने व त्याच्या साथीदारांनी फिर्यादीला लाकडी बांबुने व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.
आजू बाजूच्या दुकानदार व रस्त्यावरील लोकांना मदतीला कोणी आले तर तुम्हालाही मारेल, असे धमकाविले.
पोलिसांनी चौघांना अटक केली असून इतरांवर गुन्हा दाखल केला आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Pune Crime | I am the bhai of this college Terror of pune criminals in a reputed college in Pune

 

हे देखील वाचा :

Pune Crime | प्रेयसीचं ‘झेंगाट’ मॅनेजरशी असल्याचा संशय, जाब विचारताना झालेल्या वादात मित्राचा खून; पुण्याच्या लोकमान्यनगरमधील घटना

Gold Silver Price Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय ?; सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या

Supriya Sule On Amruta Fadnavis | ‘मी अमृता फडणवीस यांना ट्विटरवर फॉलो करत नाही’ – सुप्रिया सुळे

 

The post Pune Crime | ‘मी भाई आहे या कॉलेजचा’ ! गल्ली बोळाबरोबरच आता कॉलेजमध्येही भाईगिरी सुरु; पुण्यातील नामांकित महाविद्यालयात सराईत गुन्हेगाराची दहशत appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article